मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|
पद प्रसन्न फुलल्या फुलां...

वसंत - पद प्रसन्न फुलल्या फुलां...

मराठी शब्दसंपत्ति


पद
प्रसन्न फुलल्या फुलांसंगतीं मूकबोल बोलूं ।
फुलांसम अंतरंग उमलूं ॥
मंदमंद वार्‍याच्या झुळुकांसंगें आंदोलूं ।
वायुचा झोंपाळा झोलूं ॥
झुळुझुळु वाहे झरा त्यासवें ताल धरुन चालूं ।
झर्‍याचा सुस्वर रव झेलूं ॥
कोमल - चंचल - लतापल्लवीं आनंदें डोलूं ।
पल्लवांसंगतीं हेळूं ॥
निरभ्र निश्चल नभोवितानीं दृश्यसार तोलूं ।
भवाचें गूढ कुलुप खोलूं ॥
खळबळण्यार्‍या लाटांसह या मनोवृत्ति घोळूं ।
जिवींच्या लाटा कल्लोळूं ।
बागडती नाचती वांसरें त्यांसंगें मिसळूं
मानवी जडतेला चाळूं ॥
रुचिर बालकें हंसती खुलती चला त्यांत खेळूं ।
त्यांसवें चैतन्यीं लोळूं ॥
खेळाया जाऊं । वसंतीं वसंतसम पोहूं ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : January 22, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP