प्रबोधसुधाकर - ध्यानविधिप्रकरणम् ।

भगवान् शंकराचार्य कृत ’प्रबोध सुधाकर’ हा लघु प्रकरण ग्रन्थ ज्ञान देणाराही नाही परंतु ज्ञानाचा अनुभव करणारा आहे. या ग्रन्थात जीवनोपयोगी वैराग्य ज्ञान आणि भक्तिची विस्तृत चर्चा आहे.


ध्यानविधिप्रकरणम् ।
यमुनातटनिकटस्थितवृन्दावनकानने महारम्ये ।
कल्पद्रुमतलभूमौ चरणं चरणोपरि स्थाप्य ॥१८५॥
यमुनेच्या तीराजवळील वृंदावन नांवाच्या वनांत असलेल्या कल्पवृक्षाखालच्या रमणीय भूमीवर एका पायावर दुसरा पाय ठेवून ॥डाव्या पायावर उजवा पाय दुमडून ॥ ॥१८५॥

तिष्ठन्तं घननीलं स्वतेजसा भासयन्तमिह विश्वम्‍ ॥
पीताम्बरपरिधानं चन्दनकर्पूरलिप्तसर्वागम्‍ ॥१८६॥
उभा राहिलेल्या, स्वत:च्या तेजाने सर्व विश्वास प्रकाशित करणार्‍या,  पीतांबरधारी, सर्वागास चंदन आणि कापूर यांचें उटणें लाविलेल्या, मेघासारखा नील वर्ण धारण करणार्‍या, ॥१८६॥

आकर्णपूर्णनेत्रं कुण्डलयुगमाण्डितश्रवणम्‍ ॥
मन्दस्मितमुखकमलं सुकौस्तु भोदारमणिहारम्‍ ॥१८७॥
ज्याचे नेत्र कानापर्यंत विस्तृत असून दोन्ही कानांत कुंडलें शोभत आहेत, मंद (किंचित्‍) हास्य ज्याच्या मुखावर झळकत आहे, चांगलीं रत्नें आणि कौस्तुभमणि यांचा हार ज्याच्या गळ्यांत शोभत आहे, ॥१८७॥

वलयांगुलीयकाद्यानुज्ज्वलयन्तं स्वलंकारान्‍ ॥
गलविलुचितवनमालं स्वतेजसाऽपास्तकलिकालम्‍ ॥१८८॥
कडीं, तोडे, आंगठया, वगैरे अलंकारांस आपल्या तेजस्वी आणि सुंदर कांतीनें शोभविणार्‍या, गळ्यांत पायापर्यत लोंबणारी वनमाला धारण करणार्‍या,  आणि स्वत:च्या सामर्थ्यानें कलिकालाला (अशुभ कालाला) दूर करणार्‍या, ॥१८८॥

गुज्जारवालिकलितं गुज्जापुज्जान्वितं शिरसि ॥
भुज्जानं सह गोपै: कुज्जान्तर्वातिंनं हरिं स्मरत ॥१८९॥
गुंजारव करणार्‍या भ्रमरांनीं वेढलेल्या, मस्तकावर गुंजांनीं मढविलेला मुगुट धारण करणार्‍या, गोपालांसह भोजन करणार्‍या, आणि कुज्जवनांत वास करणार्‍या अशा श्रीकृष्णाचें ध्यान करा. ॥१८९॥

मन्दारपुष्पवासितमन्दानिलसेवितं परानन्दम्‍ ॥
मन्दाकिनीयुतपदं नमत महानन्ददं महापुरुषम्‍ ॥१९०॥
मंदाराच्या फुलानीं सुगंधित झालेल्या मंद वार्‍यानें सेविलेल्या, ज्याच्या चरणाचे ठिकाणीं भागीरथी -गंगा वास्तव्य करिते, अशा त्या पूर्णानंद देणार्‍या पुरुषोत्तमाला वन्दन करा. ॥१९०॥

सुरभीकृतदिग्वलयं सुरभिशतैरावृतं सदा परित: ॥
सुरभीतिक्षपणमिहासुर भीमं यादवं नमत ॥१९१॥
ज्याच्या अंगच्या परिमळानें दशदिशा दरवळून गेल्या आहेत, शेंकडो गाईंनी ज्यास वेढलें आहे, देवांचें भय दूर करणार्‍या, व दैत्यांना भीती उत्पन्न करणार्‍या अशा त्या श्रीकृष्णास नमस्कार करा. ॥१९१॥

कन्दर्पकोटिसुभगं वाञ्छतफलदं दयाघनं कृष्णम्‍ ॥
त्यक्त्वा कमन्यविषयं नेत्रयुगं द्र्ष्टुमुत्सहते ॥१९२॥
कोटयवधि मदनांइतका सुंदर, इच्छिलेलें फळ देणारा, दयेचा जणूं मेघच; अशा त्या श्रीकृष्णास सोडून दुसरें कोणतें दृश्य पाहण्याची डोळे इच्छि करितील? ॥१९२॥

पुण्यतमामतिसुरसां मनोभिरामां हरे: कथां त्यक्त्वा ॥
श्रोतुं श्रवणव्दन्व्दं ग्राम्यकथामादरं वहति ॥१९३॥
तथापि सामान्य जनांचे कान अत्यंत पुण्यकारक, सुरस, मनाला आवडणार्‍या अशा श्रीकृष्णाच्या कथेस टांकून कुटाळ हकीगति ऐकण्यास तत्पर असतात. ॥१९३॥

दौर्भाग्यमिन्द्रियाणां कृष्णे विषये हि शाश्वतिके ॥
क्षणिकेषु पापकरणेष्वपि सज्जन्ते यदन्यविषयेषु ॥१९४॥
हें दुर्दैव आहे कीं, श्रीकृष्ण हा चिरकाल टिकणारा विषय असतां, अमंगळ, व क्षणिक अशा दुसर्‍या विषयांचे ठिकाणीं पापाला साधन असणारी इंद्रियें आसक्त होतात- रमतात. ॥१९४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-01-13T03:00:21.9630000