प्रबोधसुधाकर - नादानुसंधानप्रकरणम् ।

भगवान् शंकराचार्य कृत ’प्रबोध सुधाकर’ हा लघु प्रकरण ग्रन्थ ज्ञान देणाराही नाही परंतु ज्ञानाचा अनुभव करणारा आहे. या ग्रन्थात जीवनोपयोगी वैराग्य ज्ञान आणि भक्तिची विस्तृत चर्चा आहे.


नादानुसंधानप्रकरणम् ।
यावत्क्षण क्षणार्ध स्वरुपपरिचिन्तनं क्रियते ॥
तावदृक्षिणकर्णे त्वनाहत: श्रूयते शब्द: ॥१४४॥
एक क्षण किंवा अर्ध क्षण (एकाग्र मनानें) आत्मस्वरुपाचें  चिंतन केलें तर तोंपर्यत उजव्या कानांत अनाहत- आपोआप होणारा शब्द ऐकूं येतो. ॥१४४॥

सिध्दयारम्भ- स्थिरता-विश्रम-विश्वास-बीजशुध्दीनाम्‍ ॥
उपलक्षणं हि मनस: परमं नादानुसंधानम्‍ ॥१४५॥
त्या अनाहत नादाकडे मनाची एकाग्रता होणें हें, सिध्दी़चा आरंभ, स्थिरता, विश्रांति, श्रध्दा व बीजशुध्दि ॥मन: शुध्दि॥ यांचें उपलक्षण ॥द्योतक॥ होय. ॥१४५॥

भेरी-मृदडं-शखद्याहतनादे मन: क्षणं रमते ॥
किं पुनरनाहतेऽस्मिन्मधुमधुरेऽखण्डिते स्वस्थे ॥१४६॥
नौबद, मृदंग, आणि शंख यांपासून होणार्‍या नादाचे ठिकाणीं मन क्षणभर रमतें. मग (ह्या नादापेक्षां हजारोंपटीनें श्रेष्ठ,) अखंड, मथुरांत मधुर, अशा अकृत्रिमपणें आपल्या मधेंच उत्पन्न होणार्‍या नादाचे ठिकाणीं मन रममाण होईल हें काय सांगावें? ॥१४६॥

चित्त विषयोगपरमाद्यथा यथा याति नैश्चल्यम्‍ ॥
वेणोरिव दीर्घतसस्तथा तथा श्रूयते नाद: ॥१४७॥
आणि चित्त विषयांपासून जसजसें परावृत्त होऊन स्थिर होतें, तसतसा उजव्या कानांतील नाद वेणुनादाप्रमाणें मोठयानें ऐकूं येतो. ॥१४७॥

नादाभ्यन्वार्वर्ति ज्योतिर्यव्दर्तते हि चिरम्‍ ॥
तत्र मनो लीनं चेन्न पुन: संसारबन्धाय ॥१४८॥
तसेंच त्या नादाचे अंतर्भागांत जें ज्योतिस्वरुप ब्रह्म सतत वास करितें; तेथे जर मनाची एकाग्रता झाली तर तें मन पुन:संसारबंधास कारण होत नाहीं. ॥१४८॥

परमानन्दानुभवात्‍ सुचिरं नादानुसंधानात्‍ ॥
श्रेष्ठश्चित्तलयोऽयं सत्स्वन्यलयेष्वनेकेषु ॥१४९॥
पुष्कळ कालपर्यत ह्या नादाच्या अनुसंधानानें (ध्यानानें) होणार्‍या श्रेष्ठ अशा आनंदाच्या अनुभवानें जी चित्ताची एकाग्रता ॥स्थैर्य॥ होते; ती दुसर्‍या अनेक प्रकारांनीं घडणार्‍या एकाग्रतेपेक्षां श्रेष्ठ होय. ॥१४९॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-01-13T02:56:43.9000000