प्रबोधसुधाकर - स्वप्रकाशताप्रकरणम् ।

भगवान् शंकराचार्य कृत ’प्रबोध सुधाकर’ हा लघु प्रकरण ग्रन्थ ज्ञान देणाराही नाही परंतु ज्ञानाचा अनुभव करणारा आहे. या ग्रन्थात जीवनोपयोगी वैराग्य ज्ञान आणि भक्तिची विस्तृत चर्चा आहे.


स्वप्रकाशताप्रकरणम् ।
रवि-चंद्र -वन्हि-दीपप्रमुखा: स्वपरप्रकाशा: स्यु: ॥
यद्यपि तथाऽ प्यमीभि: प्रकाश्यते कापि नैवात्मा ॥१३९॥
जरी सूर्य, चंद्र अग्रि, दिवा वगैरे पदार्थ आपणास व इतरांस प्रकाशित करणारे आहेत; तथापि त्यांच्यायोगानें आत्मा मात्र (मुळींच) कोठेंहि प्रकाशित होत नाहीं. ॥१३९॥

चक्षुर्व्दारैव स्यात्परात्मनो भानमेतेषाम्‍ ॥
यव्दाऽन्येऽपि पदार्था न ज्ञायन्तेऽथ केवललोकात्‍ ॥१४०॥
इतकेंच नव्हे तर; सूर्य, चंद्र, इत्यादिकांचें ज्ञान परमात्म्याच्या नेत्र वगैरे इंद्रियांचे व्दारें मिळणार्‍या शक्तीनेंच होत असतें. ती शक्ती  नसेल तर केवळ प्रकाशानेंच कोणत्याही पदार्थाचें ज्ञान होणार नाहीं. ॥१४०॥

तत्राप्यक्षिव्दारा सहायभूतो न चेदात्मा ॥
नो चेत्सत्यालोके पश्यत्यन्ध: कथं नार्थान्‍ ॥१४१॥
त्यांतही डोळ्यांचे रुपानें आत्मा साह्यकारी नसेल तर पदार्थ दिसणार नाहींत. असे नसतें तर, प्रकाश असूनहि अंध मनुष्य पदार्थास कां पहात नाहीं ? ॥१४१॥

सत्यात्मन्यपि किं नो ज्ञानं तच्चेन्द्रियांतरेण स्यात्‍ ॥
अन्धे दिक्प्रतिबन्धे करसंबन्धे पदार्थभानं हि ॥१४२॥
मग आत्मा असूनहि केवळ त्यानेंच ज्ञान कां होत नाहीं? तर तें ज्ञान आत्मा असतां दुसर्‍या इंद्रियानें होतें. जसें अंध मनुष्याची दृष्टि गेलेली असली तरी त्यास पदार्थाचें ज्ञान हस्तस्पर्श केला असतां होतें. ॥१४२॥

जानाति येन सर्व केन च तं वा निजानीयात्‍ ॥
इत्युपनिषदामुक्तिर्बुध्यत आत्माऽऽत्मना तस्मात्‍ ॥१४३॥
ज्याच्या योगानें सर्व पदार्थाचें ज्ञान होतें त्याला दुसरा कोण जाणणार ? म्हणून तो स्वत:च आपणास जाणतो असें उपनिषदें सांगतात. ॥१४३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-01-13T02:55:57.6830000