प्रबोधसुधाकर - अव्दैतप्रकरणम् ।

भगवान् शंकराचार्य कृत ’प्रबोध सुधाकर’ हा लघु प्रकरण ग्रन्थ ज्ञान देणाराही नाही परंतु ज्ञानाचा अनुभव करणारा आहे. या ग्रन्थात जीवनोपयोगी वैराग्य ज्ञान आणि भक्तिची विस्तृत चर्चा आहे.


अव्दैतप्रकरणम् ।
तदिदं य एवमार्यो वेद ब्रह्माह्मस्मीति ॥
स इदं सर्व च स्यात्तस्य हि देवाश्च नेशतेऽभूत्यै ॥११९॥
जो श्रेष्ठ पुरुष हें (दिसणारें जग) सर्व ब्रह्मरुप असून मीसुध्दां ब्रह्मरुपच आहें असें जाणतो, तो स्वत: विश्वरुप बनून जातो व देवहि त्याची हानि करण्यास समर्थ होत नाहींत. ॥११९॥

येषां स भवत्यात्मा योऽन्यामथ देवतामुपास्ते य: ॥
अहमन्योऽसावन्यश्चेथं यो वेद पशुवत्स: ॥१२०॥
त्यावेळीं मी निराळी व देव निराळा असें समजतो- जाणतो तो पशूप्रमाणें अज्ञानी समजावा. ॥१२०॥

इत्युपनिषदामुक्तिस्तथा श्रुतिर्भगवदुक्तिश्च ॥
ज्ञानी त्वात्मैवेयं  मतिर्ममेत्यत्न युक्तिरपि ॥१२१॥
असें उपनिषदांत सांगितलें आहे. शिवाय याविषयीं इतर श्रुतिहि आहेत. आणि भगवंतानींसुध्दां गीतेंत असें सांगितलें आहे कीं, ज्ञानी तर माझा आत्माच आहे असें माझें मत आहें. (त्या सिध्दांतास पोषक अशीं) युक्ति सुध्दां आहे ॥१२१॥

ऋजु वक्रं वा काष्ठं हुताशदग्धं सदग्रितां याति ॥
तत्किं हस्तग्राह्यं ऋजुवक्राकारसत्त्वेऽपि ॥१२२॥
ती अशी कीं, लांकूड सरळ असो कीं वांकडे असो; तें जळालें कीं अग्रिरुपच होतें. मग तें वाकडें किंवा सरळ कसेंहि असलें  तरी हातांत घेतां  येईल काय? (अर्थात्‍ नाहीं.) ॥१२२॥

एवं य आत्मनिष्ठो ह्यात्माकारश्च जायते पुरुष: ॥
देहीव दृश्यतेऽसौ परं त्वसौ केवलो ह्यात्मा ॥१२३॥
त्याचप्रमाणें जो पुरुष आत्मज्ञानसंपन्न झाला, कीं तो आत्मस्वरुपच होतो. बाहेरुन तो इतर देहधारी जीवांसारखा दिसला तरी तो केवळ आत्माच होय. ॥१२३॥

प्रतिफलति भानुरेकोऽनेकशरावोदकेषु यथा ॥
तव्ददसौ परमात्मा ह्येकोऽनेकेषु देहेषु ॥१२४॥
जसा एकच सूर्य अनेक परळांतील (भांडयांतील) पाण्यांत प्रतिबिंबित होतो. त्याप्रमाणें परमात्मा हा एकच असला तरी तो अनेक देहांमध्यें (निरनिराळा) भासतो. ॥१२४॥

दैवादेवकशरावे भग्रे किं वा विलीयते सूर्य: ॥
प्रतिबिम्बचश्चलत्वादर्क: किं चश्चलो भवति ॥१२५॥
तसेंच सूर्यांचे प्रतिबिंब पडलेल्या अनेक परळांपैकीं दैवयोगानें एक परळ फुटला आणि ॥पाणि सांडून गेल्यामुळें ॥ तें सूर्याचें प्रतिबिंब नाहीसें झालें म्हणून प्रत्यक्ष सूर्य नाहींसा होतो काय ? (किंवा त्या परळांतील पाणी हलल्यामुळें) त्यांतील प्रतिबिंब चंचल झालें म्हणून आकाशांतील सूर्य चंचल होतो काय? ॥१२५॥

स्वव्यापारं कुरुते यथैकसवितु: प्रकाशेन ॥
तव्दचराचरमिदं ह्येकात्मसत्तया चलति ॥१२६॥
जसें, एका सूर्याच्या प्रकाशावरच सर्व लोक आपले अनेक व्यवहार करीत असतात; तसें हें चराचर (स्थावर-जंगम जग) एका परमात्म्याच्याच सत्तेनें चाललें आहे. ॥१२६॥

येनोदकेन कद्ली- चम्पक-जात्यादय: प्रवर्धन्ते ॥
मूलक- पलाण्डु-लशुनास्तेनैवैते विभिन्नरसगन्धा: ॥१२७॥
केळी, चांफा, जाई वगैरे झाडें ज्या पाण्यानें वाढतात तेंच पाणी त्या झाडांहून रस व वास यांनीं अगदीं निराळ्या अशा मुळे, कांदे, लसून वगैरेंस घातलें तर तींहि वाढतात. ॥१२७॥

एको हि सूत्रधार: काष्ठप्रकृतीरनेकशो युगपत्‍ ॥
स्तम्भाग्रपट्टिकायां नर्तयतीह प्रगूढतया ॥१२८॥
एकटाच सूत्रधार एकावेळीं लांकडाच्या अनेक कळसूत्री बाहुल्या स्वत: गुप्त राहून खांबावरील फळीवर नाचवीत असतो. ॥१२८॥

गुड-खण्डशर्कराद्या भिन्ना: स्युर्विकृतयो यथैकेक्षो: ॥
केयूर -कडणाद्या यथैकहेम्रोऽभिधाश्च पृथक्‍ ॥१२९॥
ज्याप्रमाणें एकाच उसाचे गूळ, खडीसाखर वगैरे, निरनिरनिराळे विकार ॥प्रकार॥ होतात. किंवा एका सुवर्णालाच केयूर ॥बाहुभूषणें॥ कंकणे, वगैरे अनेक नांवें प्राप्त होतात. ॥१२९॥

एवं पृथक्स्वभावं पृथगाकारं पृथग्वृत्ति ॥
जगदुचावचमुचैरेकेनैवात्मना चलति ॥१३०॥
या सर्व दृष्टांतांप्रमाणें निरनिराळ्या स्वभावांचें, निरनिराळ्या आकारांचें, निरनिराळ्या ठिकाणीं असणारें असें (अनेक प्रकारचें) जग एकाच आत्म्याकडून चालतें . ॥१३०॥

स्कंधोध्दृतसिध्दमन्नं यावन्नाश्राति मार्गगस्तावत्‍ ॥
स्पर्शभयक्षुत्पीडे तस्मिन्भुक्ते न ते भवत: ॥१३१॥
प्रवासी मनुष्य खांद्यावरुन नेत असलेली शिदोरी जोपर्यंत खात नाहीं तोपर्यंत त्यास भुकेची बाधा आणि विटाळाचें भय राहातें; पण ती शिदोरी खाऊन टाकल्यावर भुकेनें होणारी पीडा आणि अन्न विटाळण्याची मीति हीं दोन्हीं नष्ट होतात. ॥१३१॥

मानुष -मतडां-महिष -श्व सूकरादिष्वनुस्यूतम्‍ ॥
य: पश्यति जगदीशं स एव भुक्तऽव्दयानंदम्‍ ॥१३२॥
मनुष्य, हत्ती, रेडे कुत्रे, डुकरें , इत्यदिकांमध्यें व्यापुन राहिलेल्या परमेश्वरालाच जो पहातो म्हणजे परमेश्वर सर्वातर्यामीं आहे असें जाणतो तो अव्दैतानंदाचा अनुभव घेतो. ॥१३२॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-01-13T02:46:55.6800000