लक्षणे - ६६ ते ७०

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


६६
आरंभी वंदीन अयोध्येचा राजा । भक्तांचीया काजा पावतसे ॥२॥
महासंकटीं निर्वाणीं । रामनाम वाणी उच्चारितां ॥२॥
उच्चारीतां राम होय पापक्षय । पुण्याचा निश्चय पुण्यभूमी ॥३॥
पुण्यभूमी पुण्यवंतांसीं आठवे । पापीया नाठवे कांहिं केल्यां ॥४॥
कांहिं केल्यां तुझें मन पालटेना । दास म्हणे जना सावधान ॥५॥

६७
द्रव्य दारा जनी कदा नव्हे धणी । तसें नाम वाणी असों द्यावें ॥१॥
रात्रंदिवस द्रव्यदारेंचें चिंतन । तैसें लावी मन राघवासी ॥२॥
राघवासी मन लागितां आनंद । तेणें तुटे खेद संसारीचा ॥३॥
संसारीचा केद संसारिकां होय । जया नाहिं सोय राघवाची ॥४॥
राघवाची सोय पुर्वपुण्यें होय । अंतीचा उपाय दास म्हणे ॥५॥

६८
देवाचीये पोटीं आयुष्याच्या कोटीं । ऐशा किती सृष्टी होती जाति ॥१॥
होते एजाती किती रंक जीव जंतु । अप्री तो अनंतु जैसा तैसा ॥२॥
जैसा तैसा देव आम्हां सांपडला । संदेह तुटला फुटायाचा ॥३॥
फुटायाचा भाव फुटोनियां गेला । थोर लाभ जाला शाश्वताचा ॥४॥
शाश्वताचा लाभ रामीं रामदासीं । कल्पांती तयासी भय नाहिं ॥५॥

६९
धन्य माझें भाग्य जालें सफळीत । देव सप्रचीत जेथें तेथें ॥१॥
जेथें तेथें देव येर सर्व माव । माझा अंतर्भाव निवळला ॥२॥
निवळला भाव निर्गुणीं लागतां । विवेकें जाणतां नित्यानित्य ॥३॥
नित्यानित्य बरें शोधुनि पाहिलें । मन हें राहिलें समाधानें ॥४॥
समाधानें मन जाहालें उन्मन । शुद्ध ब्रह्मज्ञान रामदासीं ॥५॥

७०
माझें मीतूंपण विवेकानें नेलें । देवाजीनें केलें समाधान ॥१॥
मी देह म्हणतां केल्या येरझारा । चुकविला फेरा चौर्‍यासीचा ॥२॥
आपुल्या सुखाचा मज दिल्हा वांटा । वैकुंठीच्या वाटा कोण धांवे ॥३॥
देवासी नेणतां गेले बहु काळ । सार्थकाची वेळ येकायेकी ॥४॥
येकायेकी येक देव सांपडला । थोर लाभ जाला काय सांगों ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP