चतुःश्लोकी भागवत - श्लोक ३९

एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत


अंतर्हितेंद्रियार्थाय हरये विहितांजलिः ॥ सर्वभूतमयो विश्वं ससर्जेदं स पूर्ववत् ॥३९॥

॥ टीका ॥
श्रीनारायण साकारला ॥ तंव तो इंद्रियां विषय केला ॥ तोचि इंद्रियातीत जाहला ॥ या नांव पावला अंतर्धाना ॥६३॥
वस्तु असुनी परिपूर्ण ॥ इंद्रिया विषय नव्हे जाण ॥ यानांव सत्य अंतर्धान ॥ सत्य सत्य सज्ञान बोलती ऋषी ॥६४॥
इंद्रियातें नव्हे दृष्ट ॥ त्यातें ह्मणती गा अदृष्ट ॥ या अर्थीं ते पुराणश्रेष्ठ ॥ बोलती पाठ अंतर्धान पैं ॥७६५॥
एवं हरि पावला अंतर्धान ॥ त्यासी स्वयें चतुरानन ॥ बद्धांजळीं करी नमन ॥ स्वानंदपूर्ण समसाम्य ॥६६॥
पूर्वीं सृष्टि नकरवे ह्मणे ॥ ते सगळी सृष्टि स्वयें होणें ॥ बाप सद्गुरूचें करणें ॥ अगमा दावणें सुगम करुनि ॥६७॥
नमाखतां हातपावो ॥ सृष्टिसर्जनीं ब्रह्मदेवो ॥ सद्गुरूचे कृपेचा नवलावो ॥ अलिप्तपणें पहाहो ब्रह्मांड रचवी ॥६८॥
एवं निर्विकल्प कल्पना ॥ ब्रह्मा करी सृष्टिसर्जना ॥ भूतभौतिकादिगुरुरचना ॥ पूर्णस्थिती जाणा जैशीतैशी ॥६९॥
रचिले चतुर्विध भूतग्राम ॥ चारी वर्ण चारीआश्रम ॥ सुरनरादि अधमोत्तम ॥ अखिलस्वधर्मकर्म विधानोक्त ॥७७०॥
स्रष्टा करी सृष्टिसर्जन ॥ तें आपणाहुनि नदेखे भिन्न ॥ आपणामाजीं सृष्टि संपूर्ण ॥ आपण परिपूर्ण सृष्टीमाजीं ॥७१॥
ब्रह्मा स्वयें सृजी निष्काम ॥ तरी लोकहितार्थ यमनियम ॥ आचरोनी स्वधर्मकर्म ॥ दावी सुगम प्रजांसी विधी ॥७२॥


References : N/A
Last Updated : August 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP