अध्याय ८४ वा - श्लोक ४१ ते ४५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


वसुदेव भवन्नूनं भक्त्या परमया हरिम् । जगतामीश्वरं प्रार्चः स यद्वां पुत्रतां गतः ॥४१॥

जो त्रिजगाचा ईश्वर । हरि परमात्मा सर्वेश्वर । भक्ति करूनि तूं निरंतर । त्यातें सादर अर्चिसी ॥१३॥
माझी भक्ति कोणे परी । तुम्हां अवगमली म्हणसी जरी । तरी ज्या कारणास्तव तो हरी । पुत्रता वरी तुम्हां सदनीं ॥१४॥
तुमच्या भक्तिभारें दाटला । म्हणोनि तुमचा पुत्र जाला । न सांगतांचि कळों आला । भक्त्युत्कर्ष हा तुमचा ॥३१५॥
वसुदेवातें इत्यादिवचनीं । अनुमोदिते जाले मुनी । पुढील कथा नृपाचे श्रवणीं । बादरायणी निरूपी ॥१६॥

श्रीशुक उवाच - इति तद्वचनं श्रुत्वा वसुदेवो महामनाः ।
तानृषीनृत्विजो वव्रे मूर्ध्नाऽऽनम्य प्रसाद्य च ॥४२॥

शुक म्हणे गा कौरवपती । ऐसी ऐकूनि मुनिभारती । वसुदेवमानस प्रसन्नवृत्ती । त्या ऋषीतें प्रार्थी आर्त्विज्या ॥१७॥
मस्तक ठेवूनि चरणांवरी । परम प्रश्रयें प्रार्थना करी । प्रसन्न करूनि व्बरव्या परी । ऋत्विज वरिले यज्ञार्थ ॥१८॥

त एनमृषयो राजन्वृता धर्मेण धार्मिकम् । तस्मिन्नयाजयन्क्षेत्रे मखैरुतमकल्पकैः ॥४३॥

शुक म्हणे गा कुरुपाळका । वरिले ऋत्विजां धार्मिकां । मग त्या ऋत्विजीं धर्मात्मका । वृष्णिनामकाप्रति तेव्हां ॥१९॥
तया कुरुक्षेत्राचे ठायीं । उचित करविले ऋतु सर्वही । उत्तम उपचार कल्पी तिहीं । साङ्गोपाङ्ग सदक्षिणा ॥३२०॥

तद्दीक्षायां प्रवृत्तायां वृष्णयः पुष्करस्रजः । स्नाताः सुवाससो राजन्राजानः सुष्ठ्वलङ्कृताः ॥४४॥

प्रवर्तलिया ते दीक्षेतें । सकळ वृष्णि संतुष्टचित्तें । सुस्नातसालंकृत होत्साते । पद्ममालान्वित विराजती ॥२१॥
तैसेचि राजे सुस्नाव स्वगणीं । सालंकृत वस्त्राभरणीं । पंकजमालामंडित सुमनीं । प्रफुल्लमानसें मिरवती ॥२२॥

तन्महिष्यश्च मुदिता निष्ककण्ठ्यः सुवाससः । दीक्षाशालामुपाजग्मुरालिप्ता वस्तुपाणयः ॥४५॥

तया नृपांच्या महिषी । आह्लादभरिता हर्षोत्कर्षीं । सालंकृता सुवाससी । कंठीं पदकें ज्या धरिती ॥२३॥
दिव्याभरणीं प्रमुदितवक्त्रा । सौभाग्यमंडित सलिलजनेत्रा । कुंकुमचंदनचर्चितगात्रा । भरूनि पात्रामाजि द्रव्यें ॥२४॥
यज्ञारंभीं उचितार्हणा । पात्रीं भरूनि पदार्थ नाना । सवृष्णिनृपांच्या अंगना । दीक्षासदना प्रवेशती ॥३२५॥
तये समयींचा परमानंद । लोकत्रयीं भरला विशद । गगनगर्भीं कोंदला नाद । तोही अनुवाद अवधारा ॥२६॥

N/A

References : N/A
Last Updated : June 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP