गूढः कन्यागृहे शश्वत्प्रवृद्धस्नेहया तया । नाहर्गणान्स बुबुध ऊषयाऽपहृतेंद्रियः ॥२६॥

परम गूढ कन्यागार । भोंवता तळवटीं रक्षकभार । तेथ अनिरुद्ध निरंतर । क्रीडातर आन नुमजे ॥८९॥
नित्य नूतन वाढवी स्नेह । तये उषेनें घालूनि मोह । स्वाधीन केला इंद्रियसमूह । नुमजे गताहर्गणातें तो ॥२९०॥
मज अंतरली द्वारकापुरी । कैंची कोण हे नव अंतुरी । किती क्रमिल्या दिवसरात्री । तें अंतरीं उमजेना ॥९१॥
असो अनिरुद्धाची कथा । निगूढ एकान्तीं वर्ततां । पुढें प्रकट झाली वार्ता । तें नृपनाथा अवधारीं ॥९२॥

तां तथा यदुवीरेण भुज्यमानां हतव्रताम् । हेतुभिर्लक्षयांचक्रुराप्रीतां दुरवच्छदैः ॥२७॥

पूर्वोक्त प्रकारें यथोपचार । अनिरुद्धनामा जो यदुवीर । तेणें उषेतें निरंतर । भोगितां फार दिन गेले ॥९३॥
जियेचें पातिव्रत्य अभंग । लौकिकीं अविदित तो प्रसंग । कन्याकाव्रताचा झाला भंग । रक्षकवर्ग गुजबुजिती ॥९४॥
अनिरुद्धप्राप्तीचा परम हर्ष । नव नव क्रीडेचा उत्कर्ष । निर्भय निःशंक दुर्धर्ष । चिह्नें अशेष प्रकटलीं ॥२९५॥
रमणें रमविली जे कां रमणी । ते जाणों ये अवयवचिह्नीं । अपरें चिह्नें संभाषणीं । क्रीडावर्तनीं प्रकटती ॥९६॥
पुरुषभुक्त झाली उषा । अनूढा असतां पावली दोषा । झांकूं न शके हेतुविशेषा । रक्षकां अशेषां जाणवलें ॥९७॥
दंतक्षतें उमटती अधरीं । नखक्षतें उरोजांवरी । कारणद्रावलांछनें वस्त्रीं । रहस्य किंकरी प्रकाशिती ॥९८॥
कर्णोपकर्णीं फांकली गोष्टी । रक्षक लक्षिती सूक्ष्मदृष्टी । गोचर होतां सर्व राहटी । म्हणती खोटी चर्या हे ॥९९॥
राजकन्या झाली भ्रष्ट । आम्हां भोंवेल हें अरिष्ट । यालागीं आतांचि नृपासी स्पष्ट । सांगोनि कष्ट निरसावे ॥३००॥

भटा आवेदयांचक्रू राजंस्ते दुहितर्वयम् । विचेष्टितं लक्षयामः कन्यायाः कुलदूषणम् ॥२८॥
 
कन्यागारींचे रक्षणगण । वदती जोहारूनियां बाणचरण । म्हणती कन्येनें दूषण । लाविलें संपूर्ण कुळातें ॥१॥
तुमची कन्या जे कां उषा । रतली कोणा एका पुरुषा । क्रीडासुखें क्रमिती निशा । आम्हीं रहस्या लक्षिलें ॥२॥
दुष्ट कन्येचें चेष्टित । लक्षूनि आम्हीं रक्षक दूत । तुम्हांसि कथिला तो वृत्तान्त । करावें उचित कळे तैसें ॥३॥
गुप्त पुरुष कन्यागारीं । उषेसहित क्रीडा करी । प्रियतम वाटेल जरी अंतरीं । तरी त्या नोवरी सुखें दीजे ॥४॥
अथवा निकरें कराल दण्ड । तरी लौकिकीं होईल भंड । आम्हां रक्षकां जन उदंड । दूषितां तोंड न काढवे ॥३०५॥
रक्षकीं ऐसिया समाचारा । कथूनि स्वविषयीं परिहारा । देते झाले त्या प्रकारा । म्हणे अवधारा शुकयोगी ॥६॥

अनपायिभिरस्माभिर्गुप्तायाश्च गृहे प्रभो । कन्याया दूषणं पुंभिर्दुष्प्रोक्षाया च विग्रहे ॥२९॥

दूत म्हणती प्रभो समर्था । तुलना नाहीं तव सामर्थ्या । कन्येचि दूषणें वृथा । केलें प्रभुत्वा तुमचिया ॥७॥
दुर्गम कन्यागारीं गुप्त । आम्ही रक्षकपुरुष नित्य । रक्षित असतां अपायरहित । केलें अद्भुत चरित्र हें ॥८॥
अपायरहित म्हणसी कैसें । अष्ठौ प्रहर विभागवशें । अतंद्रित जागृत घरटीमिषें । सावध आपैसे शस्त्रांस्त्रीं ॥९॥
ऐसे प्रमादरहित आम्ही । सावध रक्षित असतां स्वामी । विरुद्धाचरण कन्याधामीं । तें पाहूनि तुम्हीं नियमावें ॥३१०॥
कोणी दावूं न शके बोटीं । दावितां पावे दुःखकोटी । ऐसिये मंदिरीं दुर्घटी । विरुद्ध राहटी प्रवर्तला ॥११॥
कोण्या मार्गें कोण्या योगें । कोण्या विचारें कोण प्रसंगें । दुष्टाचरण कवणासंगें । कन्येसि लागे हें न कळे ॥१२॥
रक्षण करितां अपाय कांहीं । रक्षकापासूनि घडला नाहीं । सावध रक्षितां सर्वदाही । वृत्तान्त सर्वही तुम्हां कथितों ॥१३॥
कार्यप्रसंगें प्रेरणेची । परम दुष्टा सखी जीची । तिचिया विरुद्धआचरणाची । क्रिया रक्षक नेणों आम्हे ॥१४॥
रक्षकांचें ऐकूनि वचन । काय करिता झाला बाण । श्रोतीं होवोनि सावधान । तें संपूर्ण परिसावें ॥३१५॥

ततः पव्यथितो बाण दुहितुः श्रुतदूषणः । त्वरित कन्यगाकारं प्राप्तोऽद्राक्षीद्यदूद्वहम् ॥३०॥

स्वकनेचें दुष्टाचरण । ऐकोनि हृदयीं खोंचला बाण । त्यानंतरें कन्यासदन । शीघ्र आपण प्रवेशला ॥१६॥
कन्यगारीं अकस्मात । सक्रोध बाण झाला प्राप्त । तंव तो देखतां झाला तेथ । वीर समर्थ युदुत्तम ॥१७॥
यासवांमाजी धुरंद्र । अनिरुद्ध नरवर्ष सुन्दर । स्वकन्येती क्रीडागर । देखे असुर तें ऐका ॥१८॥

N/A

References : N/A
Last Updated : May 10, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP