शाहीर हैबती - सवाल

शाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.


( सवाल )
बस बसा कविराज शब्दाची घालुनिया आडती ।
परस्परा समजेल कुशलता ज्ञानाची होईल झडती ॥ध्रु०॥
दुसर्‍याचें आश्रयानें बोलता आता प्रत्ययास येईल ।
व्यर्थ कविला दुषण देता क्षणामध्यें अब्रु घेईल ।
पाठीमागे गप्पा झोकिता क्षणांत अब्रु घेईल ।
गैर अर्थ बोलणें बोलता शतमूर्ख तो होईल ।
एक पुस सहज पुसतो सभेमध्यें होईल झडती ॥१॥
मारुती अकरा एक सारखे होते ऐकून घ्यावें ।
एक भक्त त्या ठाई सेवा करी नित्य सोने वाही ।
एक मूर्तीला सोने वाहिले कीं पुन्हा दुप्पट व्हावे ।
शेवटले मारुतीला साने वाहता सारखेच यावें ।
अशी त्याची नित्यानें सेवा घडती ॥२॥
प्रथम मुळीं किती सोने घेतले । अंक तेवढा सांगावा ।
पुढें तयांचा प्रयोग पुसतां ऐसा समजावा ।
चौदा कल्प सोने वाहिले किती आकार झाला पाहावा ।
कितिक झाल्या खंड्या मण शेर करून दावा ।
सभेमध्यें उत्तर बोला सर्वात आवडती ॥३॥
किती मुळीं सोने होते वजन सांगा त्याचे ।
कितिक झाले गुंजा तोळे जवू करून साचे ।
कवि हैबता म्हणे गणू नका काम हे गाण्याचे
नाथ निरंजन प्रसन्न होईल निरसन होईल प्रश्नाचे ।
सभेंत उत्तर बोला गुरुकृपा आहे पुरती ।
परस्परा समजेल कुशलता ज्ञानाची होईल झडती ॥४॥

३७
आम्ही एक सुंदर पाहिनी वरुशे तेरा ।
शीर उराला, उर शिराला शास्त्रीं पाहे कविश्वरा ॥ध्रु०॥
जिच्या कमरेला छपन्न हात पाय तीनशे खांद्याला ।
सर्व अंगाला एकच डोके नाके तीन तिच्या तळव्याला ।
गाल घोट्याला कान होटाला दात हताचा अंगठ्याला ।
कान सोळाशे योनी चारशे होत्या पायाच्या गुडघ्याला ।
मांड्या तिच्या गणतीस आल्या मोजुन पाहिल्या त्या सतरा ।
माय बाप नाहीं भ्रतार नाहीं नीर सुन्या मध्यें आहे थारा ॥१॥
पाच काळजे त्या नारीला तीन पोटे परीयेसी ।
चोळी घातली पायामध्यें लुगडे गुंडाळलें शिरासी ।
एक थान बिनदुधाचे होते तिच्या टिरीशी ।
गुदद्वार सहाशास्त्रे वेद वर्णीती परीयेसी ।
सर्वकाळ निपुण चांगली पुराणे बोलती आठरा ।
बारा वर्षांतुन येती एकदा पाहा कामिनी आकारा ॥२॥
ब्रह्मा विष्णु महेश हे तिन्ही देव तिजला भिताती ।
सप्त द्विप नव खंडें चौदा दुर्गे मुखी वसती ।
आनंत हात विष्णु कारणें ते सेवा तिची करिती ।
परंप्रतापी महा अनुतापी स्वरूप सुंदरा रुपवन्ती ।
छपन्न कोटी भूमिका तेथील जाणावी रे खेचरा ।
ध्यानीं धरवेना स्मरणीं पाहवेना बुद्धिमंद तेथें अगोचरा ॥३॥
नार ऐवढी सांगून द्यावा कविराया मज लौकर ।
सद्गुरुला पुसुन येई देई पदाचे उत्तर ।
कविराज हैबती हमेशा गातो भेद - गुण - गंभीर ।
तुरेवाल्याचे कान कापले गैरी पळती दुरदुर ।
तुला एक मुदत देतो कविराय जन्म आठरा ।
नाथ निरंजन प्रसन्न झले सवाई जरीचा फरारा ॥४॥

३८
तुरेवाले प्रश्न विचारतात : ह्या पृथ्वीवर १०७ मस्तकें असणारा मनुष्य कोण ? त्याचे नांव काय ?
हैबतीबुवा प्रश्नाचें उत्तर खालील कवनांत देतो :-
( उत्तर चढाचे )
तुम्ही ज्ञानसंपन्न बैसला सर्व जाणते मतांतर ।
जाबसाल पुसल्याचा निर्णय ऐकून घ्या उत्तर ।
लहान थोर बैसले सभेमध्यें चित्त द्यावें शब्दाला ।
शास्त्रमती कविकार बोलले तेंच सांगतो तुम्हाला ।
नर देखला स्वार नंदीवर लांब असें म्हणती ज्याला ।
मुगुटी गंगा जटेंत ज्याच्या कंठीं वासुकी विषबाला ।
अर्धचंद्र मस्तकीं शोभतो, शोभायमान सुंदर ॥ध्रु०॥
पंच वदन श्री सांब नंदी तो वदन सहावे म्हणतात ।
वदन सातवे आहे गंगेचे ऐसी ही झाली सात ।
शंभर वदनें, कंठीं वासुकी हे वदती शास्त्रांत ।
एकुन वदने झाली एकशें सात ॥
नेत्र दोनशें चौदा मस्तकीं एक जमा पंधरा धरा ॥ध्रु०॥
कर्ण दहा तें सदाशिवाचे, दोन नंदीचे तें, तें धरलें ।
वासुकिला तर कर्णच नाहींत, चक्षुश्रवा ऐसे कळले ।
शोभिवंत नर असा श्रेष्ठ शास्त्र तरी बोलुन गेले ।
शचिनाथ सुरपति ज्याला ध्यान, करिती निरंतर ।
प्रश्नाचें उत्तर केले हे समजावें चतुर ज्ञानी ।
तिन्ही लोकामध्यें सांब असा नमस्कारीला देवांनी ।
कविराज हैबति कविता करी शास्त्रसंमत ध्यानी ।
प्रसन्न नाथ निरंजन आहे, देतर प्रकटुन ध्यानी ।
वरदहस्त मस्तकी तयाचा समयसुचक अक्षर ।

३९
दहा प्रश्न पुसता ज्यास त्यास नित्य येता जाता ।
अर्थ शुद्ध करून सांगतों कवि तुला आता ॥ध्रु०॥
सूर्य राज पुरुष तो एक सर्वामधि धरती ।
रवि नसता आंधारीं राज्य कसे करती ।
रुपवान स्त्री तीच रात्र उडगण्या ठरती ।
रात्र नसल्यास मग नाही विसावा । सर्व लोक मरती ।
चंचल मन ते चक्र फिरे गरगरती । बिंब
तेज सूर्याचे पहा तुज वरती । हा अर्थ समजेना
तर कशाल अगाता अर्णी । दोही थड्या भरती
नदी नव जाण । नदी बंद झाल्यावरी । नाहीं
कायेचें भान । आपला बाप तोच अंतरीं मान ।
हे कळत नाहीं ज्याला त्यानें जन्माची केली हाण ।
पृथ्वी होते पर्यटन कांहीं नाहीं मागें राहिले ।
ध्यानासी आणा । सहा प्रश्न येथें आले
शास्त्राच्या बाता । गुणी हैबती दावी जन्माचा रस्ता ।
प्रसन्न नाथ महाराज भगवा बाणा डफावरती ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 16, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP