शाहीर हैबती - अमृतानुभव

शाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.


( उत्तर )
गुरुकृपानुभव प्रत्यय परीसा उत्तर प्रश्नाचें ।
ऐकावे रोकडे निगमसारात वामनाचे ॥ध्रु०॥
त्रिगुणापासुनी तत्त्व एक ती एकावुन जाण ।
पुत्र पिता महापिता एक एकावुन निर्माण ।
प्राण जोत ब्रह्मीची इंद्रिय पत्रा प्रमाण ।
दशवायो ब्रह्मासी विजाती ऐसें अनुमान ।
बंधुत्वें वर्तती नाहीं कोणामध्यें अभिमान ॥१॥
बुद्धी कमळासन मनशशी हा प्रत्यय परिमान ।
अंतःकरणाप्रति पुत्र शालक प्रमाणाचे ।
एक एकाचे वचनीं ते आप्त एकमेकाचे ॥
भ्रांत विमनस्व वनांत सर्वही आली ब्रह्मीहून ।
पांच मिळून एक प्राण ज्याला म्हणती निर्गुण ॥२॥
येणें जाणें एकवाट अद्वय मार्गें करून ।
जीव प्रकृती शिव पुरुष ब्रह्मीं वस्ती पूर्ण ।
नाद छंद ते आपण धरणीसी धरता आपण ।
पाप पुण्य ते आपण शरीर चालविता आपण ।
कुर्म पाहे ते नेत्रीं कर्कशु एके कर्णाचे ॥३॥
झोपत जागे चित्त आहे चालवणें प्राणाचे ॥
आला अंश ब्रह्मीचा परी तो ब्रह्मींच राहणार ।
गेला नाहीं कुठें आहे जेथील तेथें सार ।
तंतु तोचि आपण रू, आपण ऐसा निर्धार ।
कोष्ट तोचि आपण शेला तो आपण साचार ॥४॥
आपण आपला पुत्र वडील तो आपला विस्तार ।
आपण आपला चेला आपण गुरुनाथ सार ।
प्रश्नाचें उत्तर पाहावें वामन वचनाचें ।
वसिष्ठ निर्णय ह्याचे सांगतो सिद्धलक्षणाचे ।
निज ध्यास मानसीं हेत श्रीगुरुपदीं धरिला ॥५॥
त्याच निश्चयें करून पार हा भवसिंधु तरला ।
ध्यास जसा आळींकेचा एकच तत्त्वी सरसरला ।
भृंगी झाली आळींकेची हा समभाग हेत ठरला ।
नाथपदीं हैबती ध्यान करिता हे स्तवनाचे ।
कृपाहस्त मस्तकीं मतीबळ देता कवनाचें ॥६॥

वरील कवन हें हैबतीच्या अमृतानुभवाचें कवन आहे. ‘ तत्त्व मसि ’ चा सिद्धान्त स्पष्ट करून, गुरूकृपेनें मे भव सिंधु तरलों, अळींकेचा गुरुकृपेनें भ्रमर झालों व तरलों, असा हैबती निर्वाळा देतो.

N/A

References : N/A
Last Updated : March 16, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP