मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
श्रीलघुआत्ममथने

श्रीलघुआत्ममथने

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज


॥ श्रीगणेशायनमः ॥
मंथीं कल्पियेलें ज्ञान । त्यासी अनुभव प्रमाण । वाचाळ ह्मणती अप्रमाण । परिहार ऐकावा ॥१॥
भवद्गीता भागवत । सवालक्ष तें भारत । अष्टादश पुराण ग्रंथ । अनुभवें लिहिला ॥२॥
चारी वेद साही शास्त्रें । अष्टव्याकर्ण नाना तंत्रें । नाना मंत्र नाना यंत्रे । अनुभवें लिहिले ॥३॥
श्रीमत्शंकराचार्य । त्याणीं केलें जीवकार्य । ब्रह्मकारण प्रपंचकार्य । तदनुसारें लिहिला ॥४॥
कारण प्राप्तीचा प्रकार । सांगितला सारासार । साधन गुरुपरंपर । तदनुसारें लिहिला ॥५॥
ग्रंथ सर्व ग्रंथांतर । आणि आचार्य शंकर । भगवद्गीतादि ग्रंथ सारे । न पाहूनि पाहिले ॥६॥
ह्मणतां जिव्हेचें तें खंड । होऊनि होईल दुखंड । ह्मणती श्रोतेही वितंड । बोलूं नये सर्वथा ॥७॥
द्वंद्वा श्रोता आला ऐसा । वक्ता ह्मणे यथावकाशा । ऐका बोलतों मी ऐसा । सप्रमाण बोलिलों ॥८॥
आपुले जाणिवेनें कळे । अवघें त्रिभुवन रचिलें । तरी मी जें कां बोलिलें । मिथ्या नव्हे सर्वथा ॥९॥
सागराची प्राप्ती होतां । मग तिथें आलीं हाता । तैसी आत्म प्राप्ती होतां । ग्रंथ मात्र पाहिले ॥१०॥
वृक्ष मुळासी पावतां । स्कंद शाखा आल्या हाता । तैसी आत्म प्राप्ती होतां । ग्रंथ तितुके पाहिले ॥११॥
श्रुति स्मृति प्रमाण लिहितां । समरतांसी तरी आतं । ग्रंथा येईल विस्तारता । ह्मणूनि ग्रंथ आटोपीं ॥१२॥
स्त्रिया शुद्रादी पाहती । येथें लिहितां श्रुति स्मृती । प्रसार होईल तयां प्रती । ह्मणोनि लिहिणें ठेविलें ॥१३॥
असों किती बोलूं आतां । साक्षात्कारावीण खोटा । आत्मा अनुभवी जो तत्वता । त्यासी ग्रंथीं आनंद ॥१४॥
ऐसा परिहार लिहितां । ग्रंथ वाढूं पाहे आतां । मूर्ख गर्विंष्ट ज्या ताठा । त्यासी माझा साष्टांग ॥१५॥
परंपरा सांप्रदाय । सोडूनि ग्रंथ लागे काय । साक्षात्काराविण पाहे । त्यासी ग्रंथीं समजे ना ॥१६॥
आदिनारायणा पासून । परंपरा आली जाणून । साक्षात्कारी पुरुष पाहून । उपदेश घेतला ॥१७॥
स्वरूप संप्रदाय अयोध्यामत । सितादेवी सम दैवत । उपासना पवन सुत । मोक्षाजाणा गायत्री ॥१८॥
त्रयोदशाक्षरी मंत्र जाण । तारक त्यासी नामाभिधान । त्रिविध समाधी साधन । ग्रंथीं ते म्यां लिहिले ॥१९॥
ग्रंथ स्तुती करिती बहू । असती संसारभार वाहू । त्यासी ग्रंथीं रुची होऊ । ह्मणूनि ग्रंथ स्तविला ॥२०॥
अक्कलवंत असे नर । त्यासी न लागे उपचार । मुर्खा टोणग्याचा मार । शहाण्या मार शब्दांचा ॥२१॥
गारुड्यानें बहु केलें । नगर सोन्याचें रचिलें । मूर्ख जनासी विकिलें । शहाणा कांहीं न घे तें ॥२२॥
तैसें आत्मज्ञान नसतां । पूर्व पक्ष येतो ग्रंथा । सिद्धांतासी गांठ पडतां । पूर्व पक्ष उडतो ॥२३॥
अमृत कडू ह्मणोनि तोंडीं । घालूं जातां लागे गोडी । तैसी स्तुतीची परवडी । न करितां गोड हा ॥२४॥
साधूसंत महाजन । योगी वितरागी वित्पन्न । त्रिकाळ साष्टांग नमन । वैष्णवांचें असों त्यां ॥२५॥
लघु आत्ममथन ग्रंथ । केला जाण म्या यथार्थ । त्यासी प्रमाण भगवंत । अयोध्यावासी श्रीराम ॥२६॥
इति श्रीलघुआत्ममथने, गुरु शिष्य कथने, ग्रंथाभान निवारण सप्तम पद समाप्तः ॥ श्रीमत् सीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP