भूपाळी शंकराची - उठोनिया प्रात: काळीं । वद...

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


उठोनिया प्रात: काळीं । वदतां शंभुनामावळी ॥
होउनि पातकांची होळी । चंद्रमौळीपद लाभे ॥धृ॥
काशीक्षेत्रामाजी देव । चौदा नामें सदाशिव ॥
त्याचे नामें वदतां सर्व । जीव मोक्ष होतसे ॥१॥
ओंकारेश्वर त्रिलोचन । आदि महादेव जाण ॥
कृत्तिवासाचें दर्शन । घेतां जन उद्धरती ॥२॥
रत्नेश्वर आणि चंद्रेश्वर । केदारेश्वर धर्मेश्वर ॥
नित्य आत्मा वीरेश्वर । कामेश तो स्मरावा ॥३॥
विश्वकर्म्यानें पूजिला । विश्वकर्मेश्वर तो झाला ॥
मणिकर्णेश्वर शोभला । नानापूजा उपचारें ॥४॥
मुक्तिक्षेत्राचा अभिमानी । अविमुक्तीश्वर नामें करुनि
विश्वेश्वर शूळपाणी । निरंजनें वर्णिला ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP