विकृति

निरंजन माधव लिखित सद्वृत्तमुक्तावली.


हेमकला ( मदिरा. )
गण - भ, भ, भ, भ, भ, भ, भ, ग, ग.
यति - १२, ११.
सप्त भकार गुरुद्वय भास्करशंकरविश्रम हेमकला हे.
हेचि उमा म्हणवोनि कितेक कवी वदती गुणसागर पाहें.
प्राकृत लोक न जाणति मूळ, उगेंच इला कथिताति सवाई.
एक गुरू किति एक नियोजिति अंतपदीं अविचारित पाहीं. ॥२४॥
सोमकला.
गण - न, ज, ज, ज, ज, ज, ज, ल, ग.
यति - ७, ६, १०.
न जरस एक लघू गुरु अंतिम पादयुगीं रचिं सोमकळा;
शुभगुणमंडित, मानिति पंडित, वंद्य समस्त नरेंद्रकुळा.
यति मुनिसद्रसपंक्तिशुभाक्षर योजुनि निर्मिशि, तैंचि कुळा
यश जगतींत मिळेल अमोलिक, जाणुन पावति लोक तुला. ॥२५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP