अत्यष्टि

निरंजन माधव लिखित सद्वृत्तमुक्तावली.


कुसुमशर.
गण - न, न, न, न, न, ग, ग.
यति - १०, ७.
कुसुमशर न गण शर, गुरु युगुल अंतीं.
यति दशकहयसहित विहित पद चित्तीं.
न घडलचि किमपि तुज कुसुमशरबाधा,
रतिरमणपितृचरण जपसि सहराधा. ॥८॥
शिखरिणी.
गण - य, म, न, स, भ, ल, ग.
यति - ६, ११.
य मा ना सा भा ला ग, यति रसरुद्रीं शिखरिणी,
रसामध्यें आम्रीं फलजनित जैशी शिखरिणी.
कवीला हे गोडी बहुतपरि देते शुभगुणा
गणावृत्तांमध्यें धुरिं बरिच सर्वांस निपुणा. ॥९॥
पृथ्वी.
गण - ज, स, ज, स, य, ल, ग.
यति - ८, ९.
ज सीं ज स य ला गुरूसहित जाण पृथ्वी बरी.
समस्त फळ दे जना यति वसुग्रहीं आदरी.
सुराज्यघटना करी कविवरांशि हे सर्वथा.
प्रमाणगणलक्षणें करिं कवित्व विश्रामता. ॥१०॥
हरिणी.
गण - न, स, म, र, स, ल, ग.
यति - ६, ४, ७.
न, स, म, र, स, ला, गा वर्णांनीं जपें हरिणी धरीं.
भज यति रसीं, वेदीं, सातीं, कवी म्हणवी जरी.
सुजनचतुरां चित्ता माने जसी तव वैखरी,
ग्रथन करिजे मुक्तादामासमा मधुराक्षरीं. ॥११॥
मंदाक्रांता.
गण - म, भ, न, त, त, ग, ग.
यति - ४, ६, ७.
मंदाक्रांता म भ न त त गीं योजिजे छंदवेत्तीं.
विश्रामा घे जलनिधि, रसीं, पवर्णीं, तूं पवित्रीं.
ईशीं साजे कविवरगिरा मंडळीं सत्कवीचां
तेव्हां शोभे गुणमणी बरा साम्यतेनें रवीचा. ॥१२॥
नत्कुटक ( नर्दटक ).
गण - न, ज, भ, ज, ज, ल, ग.
यति - ७, ६, ४.
न ज भ ज जा ल गीं नियत नत्कुटकासि रचीं.
अयति असे तदां विहित नामचि देत रुची.
मुनिगुहसागरीं यति घडे तरि कोकिलक.
वदति कवी भुवी विविध रंजवि हा सुमुख. ॥१३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP