मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार|
चतुस्त्रिंशोsध्याय:

चतुस्त्रिंशोsध्याय:

श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य


ते हो  त  हे अक्षप्रिय । भूप म्हणे वदा भविष्य ।
मुनि म्हणे सप्ताहायुष्य । तुझा तनय असे तरी ॥१॥
वेदा  न्तो  पनिषत्सारा । रुद्रा विधि दे मुनीश्वरां ।
करी अधर्मसंहारा । यमपुरा वोस करी ॥२॥
तज्जा  प्य  नु भुवायम । कथी तया म्हणे ब्रह्मा ।
अभाविका हो अधर्म । भाविकां शर्मं दे हा रुद्र ॥३॥
मृत्यु  कृ  तभय जाया । रुद्रें अर्ची मृत्युंजया ।
मग रुद्राभिषेक राया । द्विजवर्यांकरवीं करी ॥४॥
त्या सु  ता  सातवे दिनीं । मृत्यु येतां तीर्थें मुनी ।
प्रोक्षी शिवदूत येउनी । मृत्युदूतां पळविले ॥५॥
धर्मा  त्मा  जो यम त्याप्रती । ते जाउनी सांगती ।
यम पुसे शैवांप्रती । ते म्हणती लेख पहा ॥६॥
तें मा  नो  नी चित्रगुप्ता । करवीं लेख पाहतां ।
यम हो भ्रांत शिवदूतां । क्षमा मागता जाहला ॥७॥
गेलें  नै  मित्तिकारिष्ट । नृप विप्रां करी तुष्ट ।
तों नारद तें अदृष्ट । सांगे स्पष्ट ऋष्युपकार ॥८॥
महा  नं  द सर्वां झाला । अयुतायू सुत जाहला ।
गुरु सांगे सतीला । ती गुरूला प्रार्थुनी म्हणे ॥९॥
इतिश्री० प० प० स० वि० सारे रुद्राभिषेकफलकथनं नाम चतुस्त्रिंशो० ॥३४॥ग्रं० सं०॥४०२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP