मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|ऐतिहासिक तर्क व उपसंहार|
भावी मुदतीची लग्ने

भावी मुदतीची लग्ने

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


असो; तात्पर्य सांगण्याचे इतकेच की, जगाच्या इतिहासात अति प्राचीन काळापासून सांप्रत काळपावेतो स्त्री - पुरुषांच्या वैवाहिक संबंधाचे एक स्वरूप म्हणून कायमचे कोणचेच राहिले नाही व तसे राहणे हे केव्हाही शक्य नाही. अतिप्राचीन काळी स्त्रीयांनी दास्याची स्थिती सोसली, व त्यानंतर परिस्थितीत बदल होत जाऊन निरनिराळ्या प्रकारच्या विवाहांची उत्पत्ती झालई. हे विवाहाचे प्रकारदेखील सर्वच एकसमयावच्छेदेकरून प्रचलित होते असे मुळीच नाही, ही गोष्ट मनुस्मृतीतील अंत:प्रमाणांवरून वर व्यक्त करून दाखविण्यात आली आहेच.
आजच्या स्थितीत ब्राह्मविवाहपद्धती चालते असे आपण मानतो, परंतु तीदेखील खरी नव्हे हे हुंडा घेणे वगैरे चालींवरून व्यक्त आहेच. स्त्रीवर्गाची सुधारणा दिवसेंदिवस होत चालली आहे, तिचा परिणाम कालान्तराने विवाहपद्धतीवर झाल्यावाचून राहणार नाही हे निश्चित आहे. प्राचीन काळी स्वयंवराची चाल होती, परंतु ती एकपक्षीय असे; म्हणजे तीत निवडणुकीचा अधिकार स्त्रियांकडे राहून पुरुषवर्गास सभास्थानी नुसत्या मिटक्या मारीत बसण्याची पाळी येई. यामुळे तशा प्रकारची विवाहपद्धती फिरून सुरू होण्याचा संभव कमी, व त्या मानाने गांधर्वपद्धतीचा उदय होण्याचा संभव विशेष दिसतो. ही पद्धती सुरू झाली, तरी स्त्रीपुरुषांस शाश्वतची बंधक होईल असे मानणे अगत्याचे नाही. कारण न जाणो, गांधर्वविवाहाची चाल पडली तरी तीतच हळूहळू फेरफार होत जाऊन पुढे त्यापासून निराळाच प्रकार निपजेल.
अर्वाचीन काळी युरोपखंड, अमेरिकाखंड इत्यादी स्थळी “ Civil Marriages ” म्हणजे “ मुदतीची लग्ने ” होतात, तशी लग्ने या देशातही होऊ लागतेल. या लग्नांचे मुख्य स्वरूप म्हटले म्हणजे विवाह होण्यापूर्वी उभयता वधूवरांच्या दरम्यान अमुक इतक्या मुदतीपर्यंत आपण उभयता एकमेकांशी स्त्रीपुरुषसंबंध न ठेविण्यास बांधलो आहो असे स्पष्ट करार होतात, व त्यांची सरकारी दरबारातून साक्षी वगैरेसुद्धा नोंद राहण्याची पाळी येते. कराराच्या मुदतीत होणारी संतती, अगर करारापूर्वी काही व कदाचित या संतती असेल तर ती, याच्या गुजार्‍यासंबंधाने स्पष्ट अटी ठरवाव्या लागतात ; व कदाचित या संततीची व्यवस्था लावण्याचे काम सरकारास आपल्या स्वत:कडे राखण्याचेही कारण पडते.
संततीची सरकारमार्फत व्यवस्था करणे ही गोष्ट भरतभूमीच्या आजपर्यंत इतिहासात केव्हाही न घडलेली अशी आहे; परंतु जगात नेहमी उत्क्रान्ती चालूच आहे, तेव्हा कालान्तराने ही गोष्ट घडून आली तरी तीत विशेष नवल मानण्याचे काही कारण नाही.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP