मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|विवाहाचे आठ प्रकार|
पुत्रिकाविधिविवाह

पुत्रिकाविधिविवाह

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


या आठ प्रकारांत अंतर्भूत न होणारा असा आणखी एक प्रकार सर्वज्ञनारायणनामक टीकाकाराने सांगितला आहे. या विवाहास त्याने ‘ पुत्रिकाविधिविवाह ’ अशी संज्ञा योजिली आहे. पुत्रिकाकरण अथवा पुत्रीकरन या शब्दाचा अर्थ मागे आलाच आहे, व त्यास अनुसरून कन्येच्या पोटी होणार्‍या पहिल्या अपत्यावर कन्यापित्याची मालकी होते हे प्रसिद्धच आहे. कन्येच्या पतीची सत्ता राहते; अर्थात होणार्‍या जामातापासून गाय - बैलांची जोडी घ्यावयाची, त्याऐवजी एक अपत्य मागून घेतले इतकाच काय तो फ़रक झाला, यासाठी या विवाहाचे गणना आर्षविवाहाच्या पोटी करिता येईल असा याच टीकाकाराने शेरा मारिला आहे.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP