मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ७४

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ७४

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


प्रत्यक्ष अनुभव नाहीं जेथ । अज्ञानाचें माजलें प्रस्थ । तेथचि वादाचा प्रसंग येत । झगडा होय निष्कारण ॥८८२॥
दोन्ही बाजू अजाणत । आपुला पक्ष स्थापूं पाहात । उभयतांचें मन दुश्चित । निर्णय काही ठरेना ॥८८३॥
वादें वाद वाढूं लागे । संतप्तता ये निजांगें । काहीं न होतां मनाजोगें । निष्कारण कालक्षेप ॥८८४॥
जाणत्यांनी वाद केला । खर्‍याखोटयाचा निवाडा झाला । तरी वाद तोचि संवाद भला । होय समाधानाकारणा ॥८८५॥
दोघेही शांतपणें । विचार करूं लागतील मनें । तरी संतोषासी काय उणें । दुराग्रह सांडलिया ॥८८६॥
परि ऐसें न घडे कांहीं । वादासी अहंकार मूळ पाही । जाणोनि नेणपण घेतां तीहीं । वाद लागे बळावूं ॥८८७॥
लौकिक मतें वाद करणें । म्हणजे स्वमताचा आग्रह धरणें । कोणी कांहीं सांगतां नाईकणें ।
वाद म्हणति तयासी ॥८८८॥
ज्याची त्याची बुध्दि प्रमाण । नाईके दुसर्‍याचें वचन । अंत:करण जाय क्षोभोन । कलह मात्र वाढवी ॥८८९॥
नास्तिकासी वाद करितां । तेथ कांहीच न ये हातां । वादामाजी जिंकों जातां । म्हणे मीच अजिंक्य ॥८९०॥
ज्यासी नाही कांहीं प्रमाण । श्रुतिशास्त्रवेदपुराण । त्यासी बोलों नये जाण । मौन धरूनि राहावें ॥८९१॥
विशेषत: धर्मविषयीं । श्रध्दा मूळ जिये ठायीं । वादावादीं न पडावें कांही । नव्हे उपयोग तयाचा ॥८९२॥
श्रध्दा उपजेपर्यंत । स्वस्थ राहावें व बोलत । विश्वास मानून प्रश्न करीत । तैचि द्यावें प्रत्युतर ॥८९३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP