मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ६६

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ६६

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


प्रेम सर्व काळ करावें । तयामाजी तन्मय व्हावें । द्वैत भावनेतें सांडावें । विसरोनिया देहभाव ॥७५७॥
देहभावना जोंवरी । जगत् भावनाही तोचिवरी । या दोन्ही भावनाझारीं । नांदे तिसरी कल्पना ॥७५८॥
ही कल्पना वृत्तिधर्में । शुभाशुभ निपजवीं कर्में । कर्में करितां भवभ्रमें । दु:खयातना दारुण ॥७५९॥
हे कल्पनाचि दोहीं ठायीं । ज्ञातृज्ञेय रूपें पाही । कर्ता कर्म ध्याता ध्येयी । हेचि नांदे एकली ॥७६०॥
ज्ञाता तरी कल्पनेता । ज्ञेय विषय भास तियेचा । मध्यें राहून देहींचा । भेदही तिणेंचि कल्पिला ॥७६१॥
ध्याता राहे अलीकडे । ध्येय वस्तु पलीकडे । दोहोंमाजी वाडेकोंडे । ध्यानवृत्ति वळावे ॥७६२॥
कर्ता अहंताभ्रमें उपजला । तो कर्मरूपें इणें सजविला । दोन्हीमाजी सिध्द झाला । करणरूपें व्यवहार ॥७६३॥
यासी त्रिपुटी ऐसें म्हणति । तियेंसी कल्पना आणी व्यक्ति । तीन रूपें दाऊनि निश्चिति ।जगदव्यवहार चालवी ॥७६४॥
व्यवहारासी कल्पना मूळ । व्यवहार तोचि संसार समूळ । एवं कल्पनेंने पसरिलें जाळ । गुंतलें तेंथें सकळ ॥७६५॥
यांतून व्हावया सोडवण । करावें कल्पनेचें उच्चाटण । त्रिरूप भंगत्रिपुटी छेदन । तेणेंवीण साधेना ॥७६६॥
कल्पनेचें परिमार्जन । नोहे केलें कल्पनेवीण । कल्पनेनेंचि कल्पना शून्य । होणें लागे निश्चयार्थी ॥७६७॥
कल्पना करावी एकाची । विश्वात्मक चैतन्याची । अखिल जड विश्वाची । असत्यता ओळखावी ॥७६८॥
तें चैतन्य नित्य शाश्वत । तोचि ईश्वर निश्वित । पुरुष, आत्मा, ब्रह्म, लिखित । सर्व तेणें लिहीलें ॥७६९॥
त्या चैतन्य स्वरूपेसीं । एकपणें नांदावयासी । दोनी नातीं दाविलीं सरसी । धनी सेवक पतिपत्नी ॥७७०॥
धनीं सेवक पाहतां दोन । देहरूपें भासती भिन्न । परि तनमनधनें करून । एकवटून राहिले ॥७७१॥
तैसेचिं देखा पतिपत्नी । एकभाव दोघांचे मनीं । काया वाचा आणि करणी । एकरूप जाहली ॥७७२॥
तैसें व्हावें अनन्य । ईश्वरासी धनी मानून । त्याचे सेवेसी घ्यावें विकून । अहर्निश रमावें ॥७७३॥
किंवा पत्नी जैसी पतिसी । अनन्य सर्वभावेसीं । तैसेचि जाण ईश्वरासी । लग्न आपुलें लावावें ॥७७४॥
जातां येतां ध्यानीं मनीं । पतिव्रतेसी पतिवांचुनि । आन कांहीं न गमे चिंतनी । अखंड राहे तयाच्या ॥७७५॥
तैसी भेदकल्पना त्यागुन । ह्रदयस्थीं व्हावें रममाण । सर्व रमणांचा रमण । नित्य रमावें तयासी ॥७७६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP