मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ३९

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ३९

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


परी ते संतभेटी अति दुर्लभ । सहज हातां नये सुलभ । जन्मांतरीचा ऋणानुबंध । असेल तरीच लाभेल ॥३९३॥
किंवा ईश्वराची सेवा घडेल । त्यासी करुणा जरी उपजेल । तरीच तो प्रेरणा करील । योग्य स्थळीं जावया ॥३९४॥
संतासन्निध जरी राहिले । अश्रध्देमुळें दूर जाहले । ऐसेंचि बहुतेकांसी घडलें । दिसो येतें प्रत्यक्ष ॥३९५॥
जयाची भावना जैसी । तया संगति घडे तैसी । जवळी असोनि नाहीं ऐसी । बुध्दि लागे उपजों ॥३९६॥
आस्था असेल जयासी । संत येवोनि भेटती त्यासी । आस्था असेल मानसीं । तरी जवळीं असतां अगोचर ॥३९७॥
संतपण नव्हे वेषावरी । तेथें ज्ञाना अज्ञाना नये सरी । नीच उच्च भावना सारी । गुंडून लागे ठेवावी ॥३९८॥
संतपण नये मोल देतां । किंवा देशोदेशीं हिंडतां । स्वर्ग मृत्यु पाताळीं । धुंडितां नये हाता कोणाच्या ॥३९९॥
संतभेटीची तळमळ । साधन तेंचि एक केवळ । त्यांवाचून सर्व पोकळ । केले ठरती उपाय ॥४००॥
ईश्वराची सेवा करितां । मनोभावें त्यासि पूजितां । तो होय प्रसन्न वरदाता । आणोनि भेटवीं संतासी ॥४०१॥
त्याचे प्रसादें तळमळ । तोचि उपजवी सर्वकाळ । तळमळीचें तेंचि फळ । संतदर्शन अमोघ ॥४०२॥
संतदर्शन नवजे वाया । कृपा करिती वरी जया । तोही होय समान तया । ऐसा महिमा तयांचा ॥४०३॥
संतकृपा झाली जयावरी । ते पावले परब्रम्ह साक्षात्कारी । परी वांया गेले चराचरी । ऐसें नाहीं ऐकिलें ॥४०४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP