मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र १३

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र १३

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


यासी विरुध्द घडेल । तरी पतितत्व निश्चयें येईल । प्राप्तावस्थें धक्का बसेल । समाधी मोडेल मनाची ॥१८९॥
मी सिध्दपूर्ण ज्ञानी । विषयांसी राहिलों जिंकोनि । काय करतील मज लागोनि । भरीं भरला अहंकारें ॥१९०॥
तरी विषयांचा संग दारुण । थोर थोर नागवले जाण । पराशर विश्वामित्रादिपूर्ण । आत्मनिष्ठ सकळ ॥१९१॥
विषयांसी लिगटले । ते स्वपदापासोनि भ्रष्ट झाले । कासावीस होऊनि राहिले । साशंकपणे अंतरीं ॥१९२॥
थोरथोरांची हे दशा । तेथ पोरांचा पाड कायसा । शुध्दाचरणाचा भरंवसा । राखिला पाहिजे अंतरीं ॥१९३॥
थोरांचे आचरण बिघडलें । तरी ते आपुल्या पुण्यबळें । निज पदवीशी नाहीं मुकले । अढळ राहिलें स्वरूपीं ॥१९४॥
परी डाग लागतां तो निघेना । धुवूनि काढितां जाईना । चारित्र्याची विटंबना । तोंडी आबालवृध्दाच्या ॥१९५॥
म्हणोनि कृतार्थ पुरुष जरी जाहले । तरी मायेतें पाहिजे रक्षिले । आपण परतीरास गेले । तरी काय नौका बुडवावी ॥१९६॥
म्हणोनि ज्ञान निष्ठेसि कारण । राखिलें पाहिजे शुध्दाचरण । सिध्दि झालियावरीही जाण ।राहिलें तरी सम्यक ॥१९७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 15, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP