मंदार मंजिरी - सदा सुवेला सुकृता

भिन्न भिन्न वेळी भिन्न भिन्न मासिकात छापलेली अशी कांही आणि आजपर्यंत मुळींच कोठेहीं न छापलेली कवी विद्याधर वामन भिडे यांची कांही निवडक काव्ये.


चांगलें कृत्य करावयाचें मनांत येतांच तें करावयाला उपक्रम करावा, मुहूर्त पहात बसूं नये, असा बोध ह्या काव्यांत केला आहे.
धनिक - “धनें उद्यांपासुनि मी अकिंचनां दयार्द्रभावें वितरीन सज्जनां” ।
कवि -
दिलें न कां आजवरी तुवां धना? न देशि वा आजहि कां धना जनां? ”
धनिक -
“गृहें उद्यांपासुनि मी अनाश्रया विशाल देईन जनां रहावया” ।
कवि-
“दिलीं न कां आजवरी तुवां गृहें? न आज कां देशि? असें सुकृत्य हें.”
धनिक -
“उद्यां अशा ह्या कृति चांगल्या दिनीं करीन अन्याहि सुपुण्यवर्ध्दिनी”
कवि -
“उद्या असें कां म्हणसी सुहृत्तमा? न आज कां तूं करिसी उपक्रमा? ॥३॥
मुमूर्षु जो अन्न नसे म्हणोनिया तयास द्या अन्न दया करोनिया ।
विलंब होतां उपयोग कायसा? मृतीं नसे वीर्य मुळीं सुधारसा ॥४॥
त्वरा करा, द्या बुडत्यास हात हो! विलंब हेतु न निमज्जनास हो ।
विलंब झाल्यास मरेल तो नर, तयास तारील न तूमचा कर ॥५॥
करावयाला सुकृतें सदा झटा, न अंतरायें सुकृतार्जनीं हटा ।
मुहूर्त सारे शुभ पुण्यसाधना, करूं नका निष्फल कालयापना ॥६॥
असेल जो जो अनुप्रत मानव तया क्षमाया न विलंब हो लव ।
बुध प्रशस्या गणिती क्षमा दया, सदा सुवेला सुकृता करावया ॥७॥
स्वदेशभव्यार्थ करावया श्रम करा त्वरा द्वारिं उभा जरी यम ।
करा त्वरा, चित्तिं धरुं नका भया, सदा सुवेला सुकृता करावया ॥८॥
स्वदेशकार्यें असतीं अनेक तीं न एकट्यालाच कधींच साधती ।
तुम्ही करावा श्रमभाग आपला, विलंब होतां न बधाल सत्फला ॥९॥
स्वधर्मसंस्थाबलवीर्यरक्षणीं त्वरा करा, साधु सुकृत्य तें गणी ।
स्वधर्मसेवा रुचते महाशयां नका कधीं ती कचरूं करावया ॥१०॥
न काल कोणाकरिताहिं थांबतो, गती न मंदा करितो कधींच तो ।
विलंब हावा सुकृतास कासया? सदा सुवेला सुकृता करावया ॥११॥
“सदा सुवेला सुकृता” काव्य वामननंदनें ।
रचिलें तें बहु प्रेमें आदरावें सदा जनें ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP