बीजमाला

प्रस्तुत ग्रंथात मंत्र, व्याख्यान, मराठी अर्थ आणि मंत्रविधान एकत्र मिळाल्याने जिज्ञासूंची तृप्ती पूर्ण होईल असा विश्वास आहे.


बीजमाला तु प्रसिद्धा एव । तदुक्तं शौनकेन ‘रुद्राक्षैर्विद्रुमैर्वापि स्फटिकैर्वापि कल्पिता । माला ग्राहया न काष्टादि कल्पिता विफला यत:’ ॥ तुलसीकाष्ठघटितैर्मणिभिर्जपमालिका ॥ इति । सौ. कल्पद्रुमे-‘पुण्याकाष्ठभवा पुत्रजीवनी रजतोद्भवा । पद्माक्षजा शंखजा वा कुशग्रंथिकृताऽथवा ॥ विद्रुमोत्था कांचनी च स्फाटिकी पुष्परागजा । वैडूर्य़गोमेदनीलजाता मारकती तथा ॥ मुक्तामयी वज्रजाता पद्मरागमयी तथा । रुद्राक्षेति च संस्कृत्य मालया प्रजपेत्तत: ॥’ इति ॥

अर्थ :--- बीजमाला प्रसिद्ध आहे. ती रुद्राक्ष, पोवळें, स्फटिक यांपैकीं असावी. तुलसीकाष्ठ अथवा पुण्यवृक्षाचे काष्ठमण्याची चालेल. रजतमणि, सुवर्णमणि, स्फटिक, पुष्पराग, मौक्तिक, कमलबीज, नीलमणि, मारकतमणि, वज्रमणि, पद्मराग, रुद्राक्ष यांपैकीं कोणत्याही मण्याची माळ जपाला योग्य आहे. मालासंस्कार  करून ती माला घ्यावी. संस्कार पुढें दिला आहे.


References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP