पंचप्रणवगायत्रीलक्षणम्‌

प्रस्तुत ग्रंथात मंत्र, व्याख्यान, मराठी अर्थ आणि मंत्रविधान एकत्र मिळाल्याने जिज्ञासूंची तृप्ती पूर्ण होईल असा विश्वास आहे.


तदुक्तं विश्वामित्रकल्पे - ‘ओंकारपूर्वमुच्चार्य भूर्भुव: स्वस्तथव च ।
गात्रयीं प्रणवांताम च मध्ये त्रि: प्रणवां तथा ॥ इति ॥’ तथा हि - पुरश्चरणाद्यनुष्ठानारंभदिनात्प्राक शुभदिने तत्कर्माधिकारार्थं - आचमनादिदेशकालौ  स्मृत्वा ‘मम इह जन्मनि जन्मांतरे वाङमन :--- कायकृतानां महापातकोपपातकानां रहसि वा कृतानां सकृदसकृदभ्यासविषयाणां ज्ञानाज्ञानमूलानां सर्वेषां पातकानां निरासार्थं सर्वप्रायश्चित्तार्थं करिष्यमाणेऽमुकानुष्ठानेऽधिकारार्थं च यथाकालं पंचप्रणवसंयुक्तगायत्र्या अयुतसंख्याकं जपमहं करिष्ये’ इति संकल्प्य तत्र संकल्पितसंख्यापूर्तीं अद्य (शक्त्यनुसारं) अमुकसंख्याकं
गायत्रीजपं करिष्यें, तन्नादौ नि, गपापतिस्मरणं वृ:त्वा गायत्र्या षडङ्गन्यासं विधाय ‘मुक्ताविद्रुमेति’ देवीं ध्यात्वा जपेत्‌ । (ॐ तत्सवुतुर्हृदयाय नम: इत्यादि षडंग:) यथा ॐ भूर्भुव:स्व: ॐ तत्सवितुर्वरेण्यं ॐ भर्गो देवस्य धीमहि ॐ धियो यो न: प्रचोदयात ॐ इति पंचप्रणवागायत्रीलक्षणम्‌ ।
==
अथ दशप्रणवाया लक्षणम‌ - सव्याहृतिकां सप्रणवां गायत्रीं शिरसा सह इति । यथा - ॐ भू: ॐ भुव: ॐ स्व: ॐ मह: ॐ जन: ॐ तप: ॐ सत्यम्‌ । ॐ तस्तवितु० प्रचोदयात्‌ ॐ आपोज्योती० ब्रम्हाभूर्भुव:स्वरोम्‌ इति ॥ शाताक्षराया: स्वरूपमुच्यते - ॐ तत्सवितुरिति  संपूर्णा गायत्री, जातवेदसे इति ऋचा. त्र्यंबकं यजामह इत्यनया च ऋचा सहितो गायत्रीमंत्र: शताक्षरो भवति । इत्येवं केवलां प्रणवपूर्विकां, पंचप्रणवा, दशप्रणवां, शताक्षरां वा गायत्रीं आत्मशोधनार्थं मंत्रशोधनार्थं च जप्त्वा शुभदिने संकल्पितानुष्ठानारंभं
कुर्यात्‌ । प्रकृते तु श्रीसूक्तानुष्ठानारंभ: कार्य: ।

अर्थ :--- प्रसंगत: येथें पंचप्रणव, दशप्रणव व शताक्षरा गायत्रीचें लक्षण माहितीकरतां सांगतो. ओंकारपूर्वक समस्त व्याहृतींचा उच्चार करून गायत्रीच्या आरंभीं, चरणांमध्यें व गायत्रीच्या शेवटीं ॐ कार म्हणावा. याप्रमाणें एकंदर पांच वेळां प्रणव येतो, म्हणून ही पंचप्रणवा गायत्री होय. प्रायश्चित्तार्थ जप करावयाचा तर वरीलप्रमाणें करावा. दशप्रणवा गायत्रीचें स्वरूप - ॐ कारपूर्वक  सप्तमहाव्याहृति, प्रणवसंपुटित गायत्री व आपोज्योति हाशिरोम्म्त्र प्रणवांत म्हणावा. याप्रमाणें यांत दहा (१०) वेळां प्रणव येतो म्हणून ही दशप्रणवा गायत्री होय.

आतां शताक्षरा गायत्रीचें स्वरूप सांगतों :--- ॐ कारपूर्वक गायत्रीमंत्र, ‘जातवेदसे’ ही ऋक म्हणून ‘त्र्यंबकं यजामहे’ ही ऋक म्हणावी. या तिन्ही मंत्रांमिळून  शंभर अक्षरें होतात. म्हणून ही शताक्षरा होय. याप्रमाणें तीन प्रकारच्या गायत्रीचें लक्षण विश्वामित्रकल्पांत सांगितलें आहे. या त्रिविध गायत्रीपैकीं यथारुचि आत्मशुद्धयर्थ व मंत्रविशुद्धयर्थ कमींत कमी दहा हजार किंवा हजार वेळां गायत्रीमंत्राचा जप करून कोणत्याही मंत्राचें पुरश्चरण करावें. म्हणजे इष्ठफलद होते. जपानें आत्मशुद्ध केल्यावांचून कोणतेंही पुरश्चरण करूं नये. ‘अमुकमंत्रस्य
पुरश्वरणाधिकारार्थं; असाच संकल्प करावा.


Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP