मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
काय करूं विठठला - कथी मज ...

काय करूं ? - काय करूं विठठला - कथी मज ...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


काय करूं विठठला - कथी मज - काय करूं विठ्ठला !
हा स्वार्थाचा वणवा बघ रे, चोंहिकडे पेटला.
धूम तयाचा मत्सर - कपट - क्रोध जगीं लोटला;
दुर्विचारघूकांचा रव हा सर्व दूर दाटला,
तुज भुलला, अज्ञानतमींहा जनसमूह चालला;
अंधश्रद्धा किती माजली, दंभ किती वाढला.
अभिमानाचें खडग उपसिलें भावभक्तिच्या छला;
जिकडे तिकडे असत्यता ही कुणी स्मरेना तुला.
अंतरंग सोडुनि बहिरंगीं हाजन वेडावला;
तुझीं लेंकरें समान सारीं कळेल तेव्हां मला.
पहा माजली घोर यादवी, वैर किती वाढला;
धर्मदीप हा विझावयासी परमेशा लागला.
नीति दारची शुनी, पुसेना ढुंकुनि कोणी तिला;
समाजबंधन शिथिल जाहलें, कीड लागली मुळां,
कसा धरिल मग राष्ट्रतरू तो मधुर मनोहर फला ?
गतानुगतिकत्वाचा खोडा जडला पायीं पुरा.
जरि आरडतों, गमे परी तो पंथ एक चांगला;
उन्नतिची ती वाढ खुंटली शरणागतवत्सला !
किती पाहसी अंत अजुनिही दाखव पथ चांगला -

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP