मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
- गाण्याची चढली कमान, नयनीं...

गाण्याची चढली कमान - - गाण्याची चढली कमान, नयनीं...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


गाण्याची चढली कमान, नयनीं स्वर्मार्ग झाला खुला;
व्योमीं तारकमालिकांसह कवि प्रेमें हसूं लागला.
त्याला हास्य परंतु दिव्य असलें आलें तरी कोठुनी ?
त्याचा उदगम नाहिं काय तुझिया दिव्यौष्ठगंधांतुनी ?
प्रेमावांचुनि कोणता कवि पिसा गाईल गाणें तरी ?
गाणें प्रेमच. तें स्फुरेल तरि का निष्प्रेम चित्तावरी ?
प्रेमानें रसरंग जो उधळिला त्याच्या तरंगांवर
होवोनी रसवंत लुब्ध हृदयें बेहोष त्यानंतर.
स्वच्छंदें मग वाहतात जिकडे त्या त्या प्रदेशांतरीं.
ताराम्च्या सुमवाटिका विलसती आकाशगंगेवरी
प्रीतीचा लडिवाळ बाळ चिमणा वक्ष:स्थलीं
ते प्रेमातुर ओष्ठचुंबनसुखा नि:शंक नादावला.

अपूर्ण

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP