मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग सातवा| ईश्र्वराचें अपार देणें प्रसंग सातवा ईश्र्वरस्तुति-प्रस्ताव ईश्र्वरच खरा मायबाप ईश्र्वर पित्याच्या विसर ईश्र्वराचें सौभाग्य ईश्र्वराचें अपार देणें ईश्र्वराच्या उपकाराचाच विसर असत्य भ्रांति नाम ज्ञान भेद-सेंडगळाचा दृष्टांत नाम ज्ञान भेद शेख महंमदास सर्पदंश प्रसंग समाप्ति प्रसंग सातवा - ईश्र्वराचें अपार देणें श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत ईश्र्वराचें अपार देणें Translation - भाषांतर अठरा भार वनस्थळीचा मेवा । तुवां जीवालागीं केला गा अव्यक्त देवा । उन्मत्त नेणती तुझा ठेवा । ढवाळी करितील ॥४३॥अनेक भोग अलंकार प्रतिष्ठा । हे मनुष्यास केली गा गुणवरिष्ठा । तुझे स्तुतिविण अनेक खटपटा । बचके पाणी धरिती ॥४४॥जगदीशाची वर्णना असे अपार । मी काय स्तुति करूं जाणे पामर । सद्गुरु बोलते जाले सगुणाकार । स्वानुभवें आपुलिया ॥४५॥कोणी एकास विंझणवारा घातला । त्यानें त्याचा उपकार मानिला । ईश्र्वरें वायु विश्र्वजना घातला । त्याचा उपकार नाहीं ॥४६॥सप्तसागर नद्या अनेक वोहळा । त्या ईश्र्वराच्या पोह्या प्रबळा । उदक सेवुनी नाठवी गोपाळा । उपकार भावेंसी ॥४७॥जे उपकार ईश्र्वराचे मानिती । त्यांचे चरणींची होऊन रजरती । मज दिल्हें उपकार मानीत संतीं । शेख महंमद म्हणे ॥४८॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP