प्रसंग तिसरा - सिंधुसरिता दृष्‍टांत

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.



ये स्‍थूळदेहींची सांगितली पितरें । मूळ पिता न कळे शुन्य आधारें । सहज सद्‌गुरु लाधले संचिताकारें । पुसावयालागीं ॥५१॥
गुरु तुम्‍हापें आलों कवणे गती । तें सांगावें गा अविनाश मूर्ति । तेणें फिटेल माझी भ्रांति । उमज पडोनियां ॥५२॥
मग बोलिलें तीर्थ-उद्धरण । मीच तुझी माता पिता सत्‍य जाण । पुण्य सांचलियां आलास मजठाकोन । सरिता सिंधु जैशी ॥५३॥
जैसें सप्तसिंधूंचें जळ । मेघांच्या सवें द्रव सकळ । आड वोहोळ स्‍वयें केवळ । सरितेंत मिळे ॥५४॥
सरिता सिंधूस मिळोनि गेली । आड वोहोळा सरिता नांव चुकली । तैसी परी तुजलागीं जाली । पुत्रराया मजशीं ॥५५॥
जैसें सरितेस चुकलें पाणी । त्‍यासी थिल्‍लरी सांचोनि उठली घाणी । तयामाजी पडले असंख्य जीवनीं । तदन्याय उन्मत्ताचा ॥५६॥
जैसा रहाटगाडग्‍याचा फेर । तैसा उन्मत्ताचा विचार । हा तूं वोळखे बा निर्धार । गुह्य गुणवंता ॥५७॥
जे निजबोधी अनुसरले । ते देव म्‍हणउनी पुजिले । माझें मजलागीं आवडलें । पवित्रार्थपणें ॥५८॥
जे जीव करिती अनाचार । गवसल्‍या राजा करी मार । निमालिया न येती मजसमोर । दुःख यातना भोगिती ॥५१॥
शेख महंमद म्‍हणे हृषीकेशी । आणिक एक विनवितों तुम्‍हांसी । जे कोणी ऐकतील या ग्रंथासी । ते समुळीं उद्धरावे ॥६०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP