प्रसंग तिसरा - प्रश्र्निक प्रश्र्नांची आवश्यकता

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.



उदकें भरिली असे विहिर । मोटेवेगळें न निघे बाहेर । तैसें पुसल्‍याविण गुणविचार । काय सांगावे तुजप्रती ॥८॥
पैल काष्‍टामाजी वन्हि असे । परी तो कांचणीवेगळा ना प्रकाशे । ऐसा शिष्‍य अधिकारें पुसे । त्‍यासी सांगावें ॥९॥
गंधियाचा पसारा अनेक औषधी । पुसल्‍यावेगळें कांही न देती । तैसी साधल्‍याविण सिद्धि । प्राप्त नव्हेचि कांहीं ॥१०॥
भरलें असे सौदागराचें घर । अनेक वस्‍ता ठीक ठेऊनि बयाजवार । वोळखोनी गिर्‍हाइकाचा अधिकार । तो तैसेंचि दावी ॥११॥
गाजराचा गिर्‍हाइक भेटला । त्‍यासी जरी केळ्यांचा हारा उघडिला । तरी आपणसीच मूर्खवाद आला ।बोल कवणासी नाहीं ॥१२॥
केळें मागितलें मुकियानें । त्‍यास वांगे जरी दिधले जाणत्‍यानें । तरी महा दु५खाची कारणें । प्रवर्तली तेथें ॥१३॥
तान्हें बाळ रडतसे पोटदुःखें । तें मातेसी न कळै उन्मेखें । तैसें पुसल्‍याविण विवेकें । सांगतां न ये मज ॥१४॥
पुसावया तुझें मन कांटाळलें । तरी म्‍यां काय पाहिजे सांगितलें । निःशंक होऊनि पाहिजे पुसिले । सद्‌गुरु म्‍हणजे शिष्‍या ॥१५॥
आत्‍मज्ञान ज्‍योती सद्‌गुरु मयंका। तूं त्रैलोक्‍याची करितां टीका। मी तुम्‍हांसी पुसल्‍याविण न पवे सुखा । तिळे तांदुळे व्हावें तुम्‍ही ॥१६॥
ज्‍या ज्ञानें तुम्‍हीं तिकडे वक्ते । त्‍या ज्ञानें व्हावें इकडे पुसते । मध्यें द्वैतपणाचे वारते । छेदूनि टाकावें ॥१७॥
सद्‌गुरु म्‍हणे मी सांगतों तैसें । तुवां मजला पुसावें विश्र्वासें । मग मी तिळा तांदुळा उल्‍हासें । दोहीं हृदयीं साक्ष ॥१८॥
जामगी पुसों गेली रंजकेलागून । गोळी चिथावोनि उतरिलें निशाण । ऐसा शिष्‍यराया धरूनियां गुण । मग मज पुसतां होईजे ॥१९॥
हा शिष्‍यासी दृष्‍टांत मानवला । मग साष्‍टांग नमस्‍कार केला । गलित होऊनि पुसता जाला । म्‍हणे सांग स्‍वामी ॥२०॥
या चहूं शक्तीचा वेगळा झाडा रूपवर्णासी सांगावा निवाडा । तो सिद्धांसाधकांत मिरवे पवाडा । प्रताप तुमचा ॥२१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP