प्रसंग दुसरा - निद्राशक्ति

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.



वोळखे निद्राशक्ति महाकाळी । या तिही शक्तींवरी जयेची धुमाळी । सुषुप्तींत गोजिरी होऊनि छळी । लिंगदेहसंगे ॥९२॥
निद्राशक्ति महा प्रचंड जाणा । तियेचा धाक साही दर्शनां । अनेक चराचर स्‍थापुनी भ्रमणा । अकळ लोपी ॥९३॥
सांगतों निद्रा शक्तीचें घर । त्रिकुटातळीचें असें विवर । तेथूनि लढती किन्नर । मदन चैतन्याचे ॥९४॥
ज्‍यास असे कृपाशक्तीचा पान्हा । त्‍यास निद्रा लागे ना सत्‍य जाणा । अखंड उन्मयी मैदाना । प्रेमें डुल्‍लतसे ॥९५॥
ते सदा सावधपणें निजेले । आपण आपणातें विसरले । मरणास मारूनियां मेले । शूरत्‍व साजे तया ॥९६॥
ते जनासी दिसती वेडे बावळे । अंतरीं भोगिती ब्रह्मसुखाचे सोहोळे । जन विजन त्‍यासी न्याहाळे । परमात्‍मा जैसा ॥९७॥
ते सर्व भोगूनियां अभोक्‍ते । विटाळी असोनि विटाळा नेणते । जैसें दर्पणावरी श्र्वान मुतें । भास अतीतपणें ॥९८॥
निद्रा मुरोनि उन्मनि प्रकाश । स्‍वरूपीं लय लागे सावकाश । ब्रह्मानंदें प्रेमबोध उल्‍हास । तें पूस पैं शिष्‍या मज ॥९९॥
हें इतुकें ऐकोनि गुह्य गुज । शेख महंमद म्‍हणजे गुरुराज । स्‍वामी निज कळा सांगावी मज । जीव निद्रा पळेसी ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP