प्रसंग दुसरा - भूषण म्‍हणजे दुःखाचें कारण

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.



बंदिस्‍त अक्षरां तुझीं तूंचि बैसविसी ॥५५॥
सुतार नाचवी भूषण घोड्याचें । तैसें मज गुरूनें केले साचें । परि चालकपण असे तुमचें मी अहं मिथ्‍या असें ॥५६॥
स्‍वामी जें जें द्याल भूषण । तेणें सत्‍य र्होल माझा अपमान । पहा द्रोणागिरीलागून । कैसें जाले असें ॥५७॥
भूषण सकळ विंझळाचा सांठा । धरूनी द्रोणागिरी म्‍हणवी मोठा । शक्ति लागतां लक्ष्मण बरवंटा । हनुमंते उपडिला ॥५८॥
तेज भूषण दिधलें रवि शशि । ते भ्रमण करिती दिननिशीं । भूषण कस्‍तुरी दिधली मृगासी । तो सायासें वधियेला ॥५९॥
यालागीं जनीं भूषणांचा डांगोरा । तो जाणिजे कर्मखोडा बेडा । भावभक्तीचा बोध निवाडा । होऊं नेदी कांहीं ॥६०॥
या नाशिवंत शरीराचीं भूषणें । तीं महा दुःखाचीं कारणें । परी ते उंच लाधेच ना ठाणे । नीर मधुर मधुर जैसें ॥६१॥
ध्रुवाहूनि उंच पद तुमचें सद्‌गुरु। ते मज लाधावें जी विघ्‍नहरु । लोकत्रयीं मानितील जाहीरु । मग ईश्र्वर जैसा अविनाश ॥६२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP