प्रसंग पहिला - पंचमा-कृपा

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.



कृपा चैतन्या महदा शक्ति । अविद्या निद्रा उघडी प्रचीति । त्‍या दोघीजणी प्रसिद्ध भांडती । जनांत निर्लज्‍जपणें ॥८५॥
वेगळालीं लक्षणें सांगेन नांवें । तीं अंतरीं वोळखोनि निवांत राहावें । द्वैती अद्वैत पडेल ठावें । केल्‍याविण जालें ॥८६॥
कृपेसंगें जो असे अवतरला । तो स्‍वतः सिद्ध साधकेश्र्वर जाला । पवित्रपणें ईश्र्वरास आवडला । स्‍वयाति म्‍हणोनियां ॥८७॥
तो मूळ वंश ईश्र्वराचा । प्रेमें घोष करी हरिनामाचा । कांटाळा वाटेल इतर गोष्‍टींचा । दुर्गम म्‍हणोनियां ॥८८॥
चैत्‍न्‍यासवें जो अवतरला । तो पाखांड अनुवादा पातला । निमालियां देवतांसी आवडला । भूतपणें असे ॥८९॥
तो ब्रह्मराक्षस अवधारा । छळितां न म्‍हणे भला बुरा । मढें स्‍मशानीं धरूनि थारा । झडपणी करित असे ॥९०॥
जे जे वासना धरूनि निमाले । ते पुन्हां तैसेच पावले । यालागीं न करणें बरळे । मन कल्‍पनेचें ॥९१॥
महदेसंगें जो अवतरला । तो असुरक्षेत्रीं असे जाला । ईश्र्वरभजनीं कंटाळला । अखंड उग्र असे ॥९२॥
बाष्‍कळ कारभारी हेतु मोठी । ऐके न पवित्रांच्या गोष्‍टी । वावगीच करी तोंडपिटी । हागवण जैसी ॥९३॥
अविद्येसंगे जो अवतरला । तो महा प्रचंड हिंसक जाला । कंटाळा न ये त्‍या दृष्‍टाला । विश्र्वासघात करितां ॥९४॥
अष्‍ट अंगीं क्रियानष्‍ट दोषी । जेथें जाय तेथें चांडाळ अपेशी । धिगू जालें आवडे ना जनासी । फटमर म्‍हणती ॥९५॥
ऐसी ही चहूं शक्तीचीं लक्षणें । वेगळालीं सांगितलीं सद्‌गुरूनें । आणिकहि गुह्यार्थ पुसणें । तोहि पुसे बापा ॥९६॥
हा ऐकोनि भेदाकार । मग शेख महंमद पुसे उत्तर । तें सांगावें जी दीनोद्धार । दया करूनियां ॥९७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP