असंगृहीत कविता - अर्वाचीन फ़ारशी

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


अय वाय् वतन् वाय्

आपत्तिशोकसिन्धूमधे बुडाली स्वभूमि ही काय ? !
ताबूत आणि कफ़नामागे चाला, उठा; म्हणा ‘ हाय ! ’            १

रक्ताने तरुणांच्या जे गेले मारले इथे, झाले
रंगित् बिम्ब शशीचें, रुधिरीं गिरिवर वनांसहित न्हाले.        २

आकांक्षा थोर कुठे ? चैतन्य, स्वाभिमान, औदार्य ?
हा ! हा ! आला लोंढा द्रोहाचा चहुंकडून अनिवार्य         ३

परदेशीय पदतलीं तुडवूं झटतात धर्म इस्लाम
अमुच्या स्वातंत्र्याचें इतिहासीं फ़क्त राहिलें नाम        ४

देशाचीच न झाली अवनति, अपकीर्ति होय धर्माची
प्राण न उरला; कुसुमें, सरू, समन शुष्क जाहलीं साचीं    ५

नाव गुलाबाचें कधि बुल्बुल संदेहदग्ध नहि घेत
लज्जरक्तचि नरगिस् धवल फ़ुलें सर्व तेवि बागेंत.              ६

चौर्य मार्ग वजिरांचा - झाला केव्हाच गोपनस्फ़ोट
उलमा, भटभिक्षुक ते पडुनी चिखलांत जाळिती पोट.         ७

खल्खालाविषयीं हे शोकाने दग्ध होतसे हृदय
रयतेच्या अंगावरतीं एकहि वस्त्र न, प्रलय-समय         ८

रत्नमया भूमीचे तुकडे केले कुणी--कशी छाती
कस्तूरिहुनि खुतनच्या अधिक सुगंधी असे तिची माती  ९

प्रासादावर ज्यांचा ताजा अजुनी जुना मुलामा तो
घुबडांची पंक्ति बसे, गिधाड टोळी, व कावळा गातो.          १०

राजकृपा लवभरही रयत बिचारी न पावली केव्हा
कार्य तिचे ओरडणें ‘ हसन् ! हुसयन् ! हाय, हाय. ’ हा देवा ११

शोकाच्या लालांविण अश्रफ़ पुष्पें न घेइ हुंगाया
प्रतिक्षणीं तो बोले : " स्वभूमि हा ! हाय सर्व हो वाया   १२

सुमार १९१६

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP