मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
होतास कसा मित्र निका तू !...

गज्जलाञ्जलि - होतास कसा मित्र निका तू !...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


होतास कसा मित्र निका तू !
गेलास परी सोडुनि कां तू ?

भङगूनि सख्या, योगसमाधी
केलास जगद्रङग फिका तू,

तो घाव बसे खोल जिवाला,
होतेंच नकोशी परि काळा;

हें प्रकृतिचें पाप पहा की
सृष्टींत नसे नित्य हिवाळा,

तों गाढ तमीं हा शशि येऊ,
स्वारस्यसुधा ओतुनि देऊ;

तत्रापि सख्या, ये ! बघ केवी
पूर्वस्मृति चित्तांत ठसे ही.

येऊल पुन्हा तीच ऊषा का ?
चित्तींच रहा ऐकत हाका !

२७ एप्रिल १९३३


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP