मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|तुटलेले दुवे म्हणजेच सुनीताञ्जली|
आवारांत रसज्ञ लोक फिरती, ...

तुटलेले दुवे - आवारांत रसज्ञ लोक फिरती, ...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


आवारांत रसज्ञ लोक फिरती, कोठे मुलें खेळती;
घासाधीसच घालिती सुवसना कोठे दुकानांतुनी;
कोठे होय पुराण, शून्य हृदयें बाया तिथे बैसती;
गाभार्‍यांत शिरूइ दर्शन तशा दाटींत घेती कुणी.
द्दश्यें हीं बघुनीहि ज्यास अगदी वाटे न कौतूहल
ऐसा ऐकिकडेस तो कुणिपहा पारावरी बैसला,
वीजेचा न तिथे प्रकाश, विरले अन्धार तो निश्चल,
हाकारी न तया कुणी, प्रभुपदीं तो रङगला ऐकला.
लाभे गे मज हीच शान्ति तुझिया रथ्यांतही सुन्दर,
दों पक्षांस अशोक गार हिरवे पाचू महामोल की !
सदगन्धी कडुनिम्ब मोहरूनि हो, येऊ कुऊचा स्वर,
- सारें ओळखिचें कसें मज जरी कोणी क्चचित ओळखी !
अन्तीं दे मज हीच शान्ति तुझिया आलिङगनीं निर्भर;
आहे का परि टाकिली जननि, मीं कीर्तीत तूझ्या भर ?

२३ मार्च १९३५

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP