मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|तुटलेले दुवे म्हणजेच सुनीताञ्जली|
माझी होशिल काय ? शब्द सहज...

तुटलेले दुवे - माझी होशिल काय ? शब्द सहज...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


माझी होशिल काय ? शब्द सहजी टाकूं नये टाकिला
तारुण्यामधि ऐकदाच तुज तो - तों जाहलों निष्प्रभ !
चातुर्थे जर गाढ भाव असता मौनांत मीं झाकिला,
तूतेंही कळतें कशावरुनि गे की मी तुझा वल्लभ ?
हातांतूनि सुटूं नये निसटुनी गेला सुटूनी शर,
होता तो शर काय ? हार, धरिला तू का न त्याला ऊरीं ?
तूही गि ऐन्दुमती न, कां बिचकशी ? नातें किती सुन्दर
मी तूझा अनिरुद्ध तू मम ऊशा ! होती किती माधुरी !
नाही का तुज शक्य तो विसरणें वेडेपणाचा क्षण ?
माफी कां न तुझ्या ऊदार हृदयी ? का मी महापातकी ?
कोठे पूर्विल ती अगत्यममता ? होशी कशी निर्घुण ?

२४ मार्च १९२३

स्थायी भाव असूनि येथ रतिचा कां शोक या नाटकीं ?
कोठेही अनिकेत मी भटकतों माळावरी ऐकला,
चैत्रींची मधुकौमुदी न मुदिता, सन्तप्त भासे मला.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP