मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कृष्‍णाजी नारायण आठल्‍ये|

तिकुडचें पहिलें पत्र - श्लोक [मंदाक्रांता]

हे पुस्तक ' केरळकोकिळ ' या मासिकात प्रथम १९१७ साली छापण्यांत आले.


केव्हां नाथा ! मधुर तुमचें पत्र फोडीन हातें ।
मार्गीं वेड्यासम नयन मी लावुनीया पहातें ॥
जातां येतां हळु हळु उठे चालता शब्‍द पायीं ।
वाटे आला जणुं लगबगा डाकवाला शिपायी ॥२७॥
नाहीं कोणी म्‍हणुनि वसते खिन्न होवोनि चित्तीं ।
चिंताक्रांत भ्रमुनि मनही होतसे शून्य वत्ती ॥
घाई घाई अवचित बरा तोंच आला शिपायी ।
घ्‍या घ्‍या घ्‍या घ्‍या ह्मणत तुमचें पत्र हें अंबुताई ॥२८॥
आनंदाची लहर उसळे वाढला सौख्यसिंधू ।
एकाएकीं नयन भरले दाटुनी अश्रुबिंदू ॥
उत्‍कंठेनें भ्रम सकलही तत्‍क्षणीं दूर गेला ।
वाचायाला हळु हळु तिनें पत्र आरंभ केला ॥२९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP