मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककवि कृत पदे|
मुक्ताबाईकृत पदें ४० आणि ४१

मुक्ताबाईकृत पदें ४० आणि ४१

पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.


पद ४० वें.

असत्य न बोलों तोंडें रे खेळया ! ॥ध्रुवपद.॥
मुंगीनें मेदिनी धरियली माथां, वायूची बांधली मोट ।
सशानें सिंह फाडुन खादला, तिळान फोडिली लाठ ॥असत्य०॥१॥
शीतानें सूर्य बांधला पायीं, चंद्रास झोंबला ताप ।
गाईनें व्याघ्र फाडियला, तेणें बेडकें गिळिळा साप ॥असत्य०॥२॥
वाळुचीं वेंटीं थोटयानें वीणलीं, तोंडाळ झालें मुकें ।
पांगुळ चढला गिरिच्या माथां, गगनीं फोडिलें टांकें ॥असत्य०॥३॥
वांझेच्या पुत्रानें उदीम केला कुपान खादलें शेत ।
स्रीविणें पुरुष बाळक व्याला, पुरला तयाचा अंत. ॥असत्य०॥४॥
मुक्ताबाई म्हणे गुरुपुत्रा ! आम्हीं बांधली गगनीं वाट ।
सकळ ब्रम्हांडें घेउनि हातीं भरिला त्याचा घोट ॥असत्य०॥५॥

पद ४१ वें.

वाहवा साहेबजी ! सद्नुरुलाल गुसाई जी ॥ध्रुवपद.॥
लालबिचमों उदीला काला औंठ पीटसों नीला ।
पीत उन्मनी भ्रमर गुंफा रस झुल बाबा ॥वाहवा०॥१॥
सहस्रदलमों डलखलीखाये आजलों परमाना ।

जहाम तहां साधू दसवा आप ठिकाणा ॥वाहवा०॥२॥
सद्रुरू चेले दोनो बरावर येक द्समों भाई ।
एकसे ऐसे दरसन पायो महाराज मुक्ताबाई ॥वाहवा०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP