मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त ७ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ७ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

‘‘विष्‍णुः’’ विप्रे तु सकलं देयं पादोनं क्षत्रिये स्‍मृतं।
वैश्येऽर्ध पादशेषस्‍तु शूद्रजातिषु शस्‍यत इति तदकामकृतमिति माधवः।
‘‘यत्त्वंगिराः’’ पर्षद्या ब्राह्मणानां तु सा राज्ञां द्विगुणा मता।
वैश्यानां त्रिगुणा प्रोक्ता पर्षद्वच्च व्रतं स्‍मृतमिति ‘‘भविष्‍ये’’ चतुर्गुणा तु शूद्राणां पर्षदुक्ता महात्‍मभिः।
पर्‍ष्‍ज्‍ञद्वच्च व्रतं प्रोक्तं पापकर्मणामिति एतच्च् ‘प्रतिलोमापवादेषु द्विगुणस्त्रिगुणोदम इति’ ‘याज्ञवल्‍क्‍योक्ते’ र्दडाधिक्‍यानुमितदोषगौरवात्‍प्रातिलोम्‍यकृतं चतुर्विधसाहसपरं।
‘द्विगुणं त्रिगुणं चैव चतुर्गुणमथापि च।
क्षत्रविट्‌शूद्रजातीनां ब्राह्मणस्‍य वधे व्रतमिति ‘प्रजापत्‍युक्ते’ वि’ प्रवधपरं च

ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र व प्रतिलोम यांच्या प्रायश्चित्ताची व्यवस्‍था.
‘‘विष्‍णु’’ ‘ब्राह्मणास ग्रंथांत जितकें प्रायश्चित्त सांगितलें असेल तितकें द्यावें. क्षत्रियास तीन चतुर्थांश, वैश्यास अर्धे आणि शूद्रांस एक चतुर्थांश एवढें प्रायश्चित्त प्रशस्‍त मानले आहे.’ असे म्‍हणतो तें इच्छेनें न केलेल्‍या पातका विषयी आहे असें ‘माधव’ म्‍हणतो. ‘‘जें तर अंगिरस्‌’’ ‘ब्राह्मणांस जी पर्षत्‌ (सभा) सांगितली, तिच्या पेक्षां क्षत्रियांस दुप्पट व वैश्यांस तिप्पट सांगितली. जशी पर्षत्‌ सांगितली त्‍या प्रमाणें व्रत (प्रायश्चित्त) सांगितले आहे, हें आणि ‘‘भविष्‍यपुराणांत’’ ज्ञात्‍यांनी शूद्रांस चौपट परिषद्‌ सांगितली आहे, आणि पापकर्मांची शुद्धि होण्या करितां परिषद्‌ (सभे) प्रमाणें प्रायश्चित्त सांगितलें आहे’ हे ‘प्रतिलोमांच्या दोषा विषयीं दुप्पट, तिप्पट दंड करावा’ अशा याज्ञवल्‍क्‍याच्या वचनावरून जास्‍ती दंडावरून अनुमान होणार्‍या दोषाच्या महत्‍वावरून प्रतिलोमानें केलेल्‍या चार प्रकारच्या साहसा बद्दल असावे. तसेच ‘क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांच्याकडून ब्राह्मणाचा वध झाला असतां त्‍यांस क्रमानें दुप्पट, तिप्पट व चौपट प्रायश्चित्त सांगितले, अशा प्रजापतीच्या वचनावरून ब्राह्मणाच्या वधाविषयी असावें.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP