मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|बृहत्संहिता|
अध्याय २६

बृहत्संहिता - अध्याय २६

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.


उत्तराषाढानक्षत्रास चंद्र असेल त्यादिवशी (आषाढीपौर्णिमेस किंवा किंचित मागे पुढे) बरोबर मोजून ठेवलेली जी सर्व बीजे, त्यांतून दुसर्‍या दिवशी जे बीज अधिक होईल, त्याची वृद्धि त्यावर्षी होते व जे कमी होईल ते उत्पन्न होत नाही. हा तुलाभिमंत्रणाचा मंत्र आहे, त्याने तराजूचे अभिमंत्रण करावे ॥१॥

या योगमंत्राने सत्या जी सरस्वीदेवी तिची स्तुति करावी. हे सत्ये, तू सत्यव्रता आहेस यास्तव जे खरे ते दाखीव ॥२॥

ज्या सत्याने चंद्र, सूर्य, ग्रह, नक्षत्र समुदाय हे पूर्वेकडे उदय पावतात व पश्चिमेकडे अस्त पावतात ॥३॥

व जे सत्य ते सत्य यथे दाखवावे ॥४॥

हे देवि, तू ब्रम्हाची कन्या आहेस, आदित्या असे तुला म्हणतात. तुझे काश्यपगोत्र आहे व तुझे नाव तुला असे प्रसिद्ध आहे ॥५॥

या तुलेचे (तराजूचे) वस्त्र (परडे) तागाचे किंवा सणाचे सहा आंगळे असावे व ते चार सूत्रांनी बद्ध असावे. ती सूत्रे दहा आंगळे असावी व त्या दोन परडयांच्या मध्यभागी सहा आंगळे कक्षा (धरावयाची दोरी) असावी ॥६॥

सुवर्ण मोजावयाचे असल्यास ते दक्षिणपरडयात ठेवावे. अन्यद्रव्ये उत्तरपरडयात ठेवावी व जलही तसेच मोजावे. त्यात कूपोदक जर अधिक होईल तर अत्यल्पवृष्टि, झर्‍याचे उदक अधिक होईल तर मध्यमवृष्टि, तळ्याचे उदक अधिक होईल तर, उत्तमवृष्टि होईल असे जाणावे. तीनही उदके कमी झाली तर अनावृष्टि होईल ॥७॥

हस्तिदंताचे वजनाप्रमाणे हत्ती अधिक किंवा कमी होतील हे जाणावे; तसेच ज्या प्राण्यास लोकर आहे त्याची र्‍हासवृद्धि लोकरीचे वजनाने समजावी. राजेसुवर्णाने, ब्राम्हाणादि मेणाने व अन्य जे धान्यादि पदार्थ असतील त्यांचे प्रत्यक्षच वजन करून त्यावरून क्षयवृद्धि समजावी ॥८॥

ती तुला (दांडी) सुवर्णाची मुख्य; रजताची मध्यम; ही दोनही न मिळत तर खैराची करावी. ज्या बाणाने पुरुषाचा वेध झाला त्या बाणाची तुला करावी. त्या तुलेचे प्रमाण, वितस्ति (१२ अंगुळे लांब) असावे ॥९॥

तुलेमध्ये मोजलेले द्रव्य पूर्वीपेक्षा कमी होईल तर त्याचा नाश. वृद्धि होईल तर वृद्धि. बरोबर होईल तर मध्यम त्यावर्षी ते द्रव्य होते. हें तुलादिव्यरहस्य रोहिणीयोगीही पहावे ॥१०॥

स्वाती, पूर्वाषाढा, रोहिणी या नक्षत्री चंद्रयोगकाली तेथे पापग्रह असतील तर शुभ नव्हे. ज्यावर्षी आषाढ अधिक असेल त्यावर्षी पूर्वाषाढा व रोहिणी हे योगद्वय दोनही महिन्यांत पहावे ॥११॥

हया तीनही योगांचे फल जर सारखे येईल तर नि:संशय फल सांगावे. आणि जर भिन्नभिन्न फले येतील तर रोहिणीचे फल तेच अधिक सांगावे ॥१२॥

रोहिणीयोगी पूर्वादि आठ दिशांच्या वायूची धान्यनिष्पत्यादि फले होतात. म्हा० पूर्वेचा वारा असेल तर सर्व धान्ये होतील.  आग्नेयीचा अ० अग्निकोप, दक्षिणेचा अ० अल्प, नैऋतीचा अ० मध्यम, पश्चिमेचा अ० चांगली, वायव्येचा अ० वृष्टि व वायु बहुत होतील, ईशानीचा वायु अ० तर शुभ अशी वृष्टि होईल ॥१३॥

आषाढी पौर्णिमा झाल्यानंतर कृष्णपक्षी चतुर्थीस पूर्वाभाद्रपदा नक्षत्री पर्जन्यवृष्टि होईल तर, वर्षाकाल शुभ होतो व त्यादिवशी वृष्टि न झाली तर वर्षाकाल अशुभ होय ॥१४॥

आषाढशुद्ध पौर्णमासीस सूर्य अस्तास जातेवेळी ईशानी दिशेचा वारा सुटेल तर, धान्य उत्तम उत्पन्न होईल ॥१५॥


॥ इतिबृहत्संहितायांआषाढीयोगोनामषड्विंशोध्याय: ॥२६॥

N/A

References : N/A
Last Updated : February 21, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP