करुणा - अभंग ३४ ते ३६

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


३४.
गजेंद्रासी उद्धरिलें । आम्हीं तुझें काय केलें ॥१॥
तारिली गणिका । तिहीं लोकीं तुझा शिक्का ॥२॥
वाल्हा कोळी अजामेळ । पापी केला पुण्यशीळ ॥३॥
गुणदोष मना नाणीं । म्हणे नाम याची जनी ॥४॥
३५.
राजाई गोणाई । अखंडित तुझे पायीं ॥१॥
मज ठेवियेलें अग्रवाटा ॥३॥
देवा  केव्हां क्षेम देसी । आपुली म्हणोनी जनी दासी ॥४॥
३६.
काय करूं पंढरीनाथा । काळ साह्य नाहीं आतां ॥१॥
मज टाकिलें परदेशीं । नारा विठा तुजपाशीं ॥२॥
श्रम बहु झाला जीवा । आतां सांभाळीं केशवा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP