उत्तरमेघ - श्लोक ५१ ते ५५

महाकवी कालिदास यांच्या मेघदूत काव्याचे मराठी समवृत्त व समश्लोकी भाषांतर.


(५१) सव्यापारामहनि न तथा पीडयेन्मद्वियोग:
शङ्के रात्रौ गुरुतरशुचं निर्विनोदं सखीं ते ।
मत्संदेशै: सुखयितुमलं पश्य साध्वीं निशीथे
तामुन्निद्रामवनिशयनां सौधवातायनस्थ: ॥

(५२) आधिक्षामां विरहशयने संनिषण्णैकपार्श्वां
प्राचीमूले तनुमिवकलामातशेषां हिमांशो: ।
नीता रात्रि: क्षण इवमया सार्धमिच्छारतैर्या
तामेवोष्णैर्विरहमहतीमश्रुतीमश्रुभिर्यापयन्तीम् ॥

(५३) शीतांशूचे किरण विवरें येति जे, पूर्वरागें ।
भेटूं जातां, दचकुनि सखी येतसे शीघ्र मागें ॥
दु:खें डोळे सजलजडशा पापण्या झांकितात ।
तेव्हां भासे भुइकमलसें दुर्दिनीं अर्धसुप्त ॥

(५४) शुद्धस्नानें सडक बनुनी गालिं जे केश येती ।
त्यांतें जीचें श्वसन डुलवी, लोपवी ओष्ठकान्ती ॥
वांछी निद्रा, मनिं धरुनि जी, आस मत्संगमाची ।
स्वप्नींही; ती असुलभ परी अश्रुभारें जियेसी ॥

(५५) बांधी आद्यीं विरहदिनिं जी, फेंकुनी पुष्पमाला ।
शापांतीं जी, विसरुनि रुजा, सिद्ध मी सोडण्याला ॥
कष्टस्पर्शा, कुटिलजटिला, वाढलेल्या नखांनीं ।
गालीं आली, फिरफिरुनियां सारिते, एकवेणी ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP