उत्तरमेघ - श्लोक १६ ते २०

महाकवी कालिदास यांच्या मेघदूत काव्याचे मराठी समवृत्त व समश्लोकी भाषांतर.


(१६) अक्षय्यान्तर्भवननिधय: प्रत्यहं रक्तकण्ठैरुद्रायद्भिर्धनपतियश:
किंनरैर्यत्र सार्धम् ।
वैभ्राजाख्यं विबुधवनितावारमुख्यासहाया
बद्धालापा बहिरुपवनं कामिनो निर्विशन्ति ॥

(१७) जातां वेगें अलकिं रचिलीं पर्णपुष्पें गळाईलीं ।
मंदाराचीं; कनककमलें कर्णिंचीं वेगळालीं ॥
जाळ्या, तैसे सर, कुचतटीं भंगले मोतियांचे ।
जेथें,सूर्योदयिं, सुचविती नैशमार्ग स्त्रियांचे ॥

(१८) राहे, येथें, धनपतिसखा शंभु तो, या भयेंची ।
ज्याची दोरी भ्रमर, न तया, काम चापासि योजी ॥
भ्रूनेत्रांनीं चतुर युवती योजिती जे विलास ।
त्यांहीं होतां विकल विरही, सिद्धि ये मन्मथास ॥

(१९) रंगीं वस्त्रें, मधु शिकविण्या दक्ष नाना विलास ।
ताज्या पानांसह बहु कळ्या, भूषणांचे विकास ॥
लावाया जो सुबक अळिता रम्य पादांबुजाला ।
जेथें इच्छातरुच सगळीं मंदनें दे स्त्रियांला ॥

(२०) तेथें माझें गृह, नृपगृहापासुनी उत्तरेनें ।
देखावें, जें सुरधनुसमा, दूरूनी, तोरणानें ॥
आहे ज्याचे जवळि सखिनें वर्धिला जेंवि तोक ।
हातीं येई सुमभर असा, बालमंदार एक ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP