सात वारांचीं पदें - गुरुवार

श्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.


पद १ लें.
भावें सेवाहो, सद्‌गुरु । भवसिंधूचें तारूं ॥धृ०॥
करुनी भक्तीची, सांगली । पावा पैलथडी ॥१॥
जपतप अवघाचि, हा शीण । गुरुविण नाहीं भजन ॥२॥
जोंवरि नाहीं रे, गुरुमुख । तोंवरि कैंचें सुख ॥३॥
सहज आनंदा गुरुकृपा । तरिच मार्ग सोपा ॥४॥

पद २ रें.
मना चिंता वाटे थोर येई राघवा । मायबाप तूं सखया स्वामी तारी तूं जडजीवा ॥
नयेसी तरी प्राण झाला माझा आघवा । सत्वर मजला भेट देई कुपाळू केशवा ॥१॥
सत्वर पावे तूं राघवा अवधारी । दीननाथ ऐसें ब्रीद साच करी ॥
राम राम म्हणताहे वैखरी । दयासिंधु म्हणा ध्याय तूं अंतरीं ॥२॥
वियोग तुझा घडि जाय कल्पांत । रात्रंदिवस मी कष्ट्तों बहुत ॥
सर्वसुख जैसें विषयुक्त अमृत । असे वाटतसे नित्य ह्रदयांत ॥३॥
ऐशा कारुण्यास येई श्रीरामा । मायबापा सखया स्वामी कृपा करी आम्हां ॥
गणिका अजामेळ तारिले निजप्रेमा । आनंद रंक बोले नेई निजधामा ॥४॥


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP