सात वारांचीं पदें - मंगळवार

श्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.


आतां हो नाहीं संसार आम्हांसी । ऐक्य मी झालों श्रीगुरुरामासी ॥ध्रु०॥
अभदे - वृत्ती चित्तासी मानली । विरक्ति शांति सर्वांगीं बाणली ॥
आमुची वस्तु गुरुकृपें भासली । निजवृत्ती तैसी स्वरूर्पी जडली ॥१॥
श्रवण मनन निदिध्यास जाहला । साक्षात्कार हौनिया ठेला ॥
षड्रिपू सहित अहंकार निमाला । अवघाचि आत्मा समभागें संचला ॥२॥
देहींच असतां देहभान मज नाहीं । जनीं विजनीं नाढळे तें कांहीं ॥
आढळे एक ब्रम्हाचि सर्वदाही । आनंद तेणें निमग्न ठायीं ठायीं ॥३॥

पद २ रें.
शांति सर्वांगीं ज्याचिया खेळे । पहा बापुडे भक्त ते भोळे ॥
कांहीं नेणोनि आंधळे । तुज लक्षुनि झांकिती डोले ॥१॥
रे रे राघोबा लागलों तुझिया पंथा रे । सर्व सांडोनि संसारचिंता रे ॥घृ०॥
आतां जाणशील तूं तें करी । सुखें तारी बा अथवा मारी ॥
मोक्ष देई कां घाली संसारीं । तुज धरिलें द्दढ अंतरीं । रे राघोबा०॥२॥
जें जें करिसी तें तें पाहूं । जेथें ठेवशील तेथें राहूं ॥
सर्व तनमन तुजला वाहूं । नाम तुझेंचि सर्वदा गाऊं । रे राघोबा०॥३॥
सर्व साक्षी सर्वही सत्ता । सर्व जाणशील तूं अनंता ॥
माझें ह्रदयींची व्यथा । आला आनंद अक्षय हाता । रे राघोवा० ॥४॥


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP