पंचकोशविवेक प्रकरणम् - श्लोक ११ ते १५

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते.


ननु देहमुपक्रम्य निद्रानंदांतवस्तुषु ॥
मा भूदात्मत्वमन्यस्तु न कश्चिदनुभूयते ॥११॥

वा० - अन्नमयादी आनंदमय पर्यंत ॥ गुहा शोधिल्या म्यां समस्त ॥
तेथ द्दष्ठीस नाहीं पडत ॥ कांहीं एक ॥६६॥
कोणी वर्णज्योति पाहिले म्हणती ॥ तरी ते अनात्म पदार्थ निश्चिती ॥
तया मूर्खाची नको गणती ॥ इया वेळीं ॥६७॥
आत्मा स्वद्दष्टीं पाहिला ॥ ऐस कोणी देखिला ना ऐकला ॥
मग कां हा व्यर्थ गलबला ॥ करीत अहा ? ॥६८॥
कोणी अनुभव बोलती ॥ ते भ्रमिष्टाचे सांगाती ॥
तुम्ही ही बैसाल तया पाती ॥ आहे म्हणतां ॥६९॥

वाढं निद्रादय: सर्वेऽनुभूयंते न चेतर: ॥
तथाप्येतेऽनुभुयंते येन तं को निवारयेत् ॥१२॥

सि - तूं बोलिलासी यथार्थ ॥ कीं पंचकोशाचा अनुभव येत ॥
बाकी नाहीं कांहीं दिसत ॥ आत्मवस्तु ॥७०॥
तरी विचारूं आतां तुपशीं ॥ कोण अनुभविता इया पंचकोशाशीं ॥
तोचि आत्मा निश्चपेशीं ॥ ओळख बापा ॥७१॥
अनुभवस्त्यावीण अनुभव ॥ बोलणें होईल वाव ॥
तरी तूंचआतां ठरीव ॥ कोण अनुभविता ॥७२॥
तूं जो ठराव करशी ॥ तोचि मान्य आम्हासी ॥
आतां भ्रमिष्टाचे पंक्तीशी ॥ कोणी बैसावें ? ॥७३॥

स्वयमेवानुमूतित्वाद्विद्यते नानुभाव्यता ॥
ज्ञातृज्ञानांतरभावादज्ञेयो न त्वसत्तया ॥१३॥

स्वत: अनुभूती असतां ॥ कैशी येईल अनुभाव्यता ॥
आपणचि आपुला विषय म्हणता ॥ होऊं न शाके ॥७४॥
तैसा सकल कोशाचा साक्षी ॥ तया अलक्षाशीं कोण लक्षी ॥
काळासी ही मो कां मक्षी ॥ तया कोण खाये ? ॥७५॥
ज्ञातृ ज्ञाना विरहीत ॥ कोण ज्ञेय असे उभारत ॥
तैसा आत्मा नाहीं होत ॥ अनुभाव्य कधीं ॥७६॥
सकळ कांहीं देखे डोळा ॥ परि आपुले रूपा हो पांगुळा ॥
म्हणोनी काम तया आंधळा ॥ म्हणो येई ? ॥७७॥
सकळ रसातें चोखे रसना ॥ स्व्रस गोडी कधींच घेईना ॥
म्हणोनी काय उणेपणा ॥ आला तिला ? ॥७८॥
तैसाचि हा आत्मा जाणा ॥ न होऊनी विषय कवणा ॥
अस्तित्वाचा ठिकाणा ॥ ढळोंच नेदी ॥७९॥

माधुर्यादिस्वभावानामन्यत्र स्वगुणार्पिणाम् ॥
स्वस्मिंस्तदर्पणपेक्षा नो न चास्त्यन्यदर्पकम् ॥१४॥

अर्पकांतरराहित्येऽप्यस्त्येषां तत्स्वभावता ॥
मा भूत्तथानुभाव्यत्वं बोधात्मा तु न हीयते ॥१५॥

शर्करा लिंबादि जाती ॥ मधुर आम्लत्वादि असती ॥
तयांसंगें इतरां येती ॥ माधुर्य आम्लता ॥८०॥
परि इतरांचेनी संगती ॥ काय ते आम्ल मधुर होती ॥
नाहीं नाहीं तयाची जाती ॥ स्वय मेव ॥८१॥
म्हणोनी दुजिया वांचून ॥ जयाचा जो स्वभाव गुण ॥
तो कधींच न होय पालटण ॥ जैसा तैसा ॥८२॥
तैसाचि हा, आत्मा जाण ॥ न हौनी अनुभाव्य पूर्ण ॥
बोधात्माचि होऊन ॥ असे सदां ॥८३॥
त्रिपुटी विरहीत ॥ असे जयाची मात ॥
तयाशीं त्रिपुटीचे आंत ॥ कैसा आणसी ? ॥८४॥
कोण पदार्थ डोळां देखे ॥ कोण रस रसना चाखे ॥
कोण शब्द कर्ण ऐके ॥ जयापरी ॥८५॥
तैसाची आत्मा कोणाही कडून ॥ न होय सिद्ध प्रमाण ॥
आंधकार सूर्य दर्शन ॥ कैसा देई ? ॥८६॥
वादी - एवं ऐसें जें तुम्ही बोलिलां ॥ श्रुतिप्रमाण कांहीं आहे ययाला ॥
कां युक्तीनेंचि बोल संपविला ॥ तुमचा तुम्हीं ॥८७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 02, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP