महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक ९८ ते १००

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते.


भूतभौतिकमायानामसत्वेऽत्यंतवासिते ॥
सद्वस्त्वद्वैतमित्येषा धीर्विपर्येति न क्वचित् ॥९८॥

सि० - अरे भूतभौतिक अवघी सृष्टी ॥ मायामय ही लाधली द्दष्टी ॥
ध्यान विचारें चित्तचतुष्टी ॥ दार्ढ्यता आली ॥४४३॥
सदद्वैत श्रुति सिद्धांती ॥ बुद्धिझाली निश्चिती ॥
न फिरे कधीं ही मागुती ॥ विषर्यासा ॥४४४॥
सकल हा ब्रम्हांडगोल ॥ अवघा मायेचा कल्लोळ ॥
ऐशी बुद्धि झाली निखळ ॥ इया विचारानें ॥४४५॥

सदद्वैता त्पृथग्भूते द्वैते भूम्यादिरूपिणि ॥
तत्तदर्थक्रिया लोके तथा द्दष्टा तथैव सा ॥९९॥

वादी - सदद्वैतता एक झाली ॥ सकलही भूतें मिथ्या ठरलीं ॥
तेणें व्यवहार दशा लोपली ॥ होय जगीं ॥४४६॥
सि० - सकल ही मिथ्या म्हणतां ॥ व्यवहारा कैशी ये बाधकता ॥
तदर्थचि क्रिया करिता ॥ जैशा तैशा ॥४४७॥
व्यवहारा सत्यत्व देशी ॥ तेणें संशय ये तुझे मानसीं ॥
येर्‍हवीं पहातां विचारेशीं ॥ बाधकता नाहीं ॥४४८॥
स्वप्नी स्वप्नव्यवहार चालती ॥ जगतीं प्राणीही तैसेचि वर्तती ॥
ज्ञाता ही त्याच रीती ॥ समजूनी चाले ॥४४९॥
घटादि मृण्मय सकल सृष्टी ॥ माती म्हणोनी आली प्रतीती ॥
तेणें व्यवहार दशा लोपती ॥ कैसी होय ॥४५०॥
नाना आरशीं मुख पाहिलें ॥ तें सत्य ऐसें कोणी मानिलें ॥
परि व्यवहारा उपेगा आलें ॥ स्वच्छास्वच्छ ॥४५१॥
देह हा नाशिवंत ॥ कोणीही न मानिती शाश्वत ॥
तरी ही व्यवहार चालत ॥ लोकीं इया ॥४५२॥
आतां एक हें एवढें होतें ॥ ज्ञाता समजूनी करितो कृत्यें ॥
तेणें सुखदु:ख संघातें ॥ न लिंपे कधीं ॥४५३॥
तत्वज्ञान देहीं होतां ॥ व्यवहार बंद पडेल सर्वथा ॥
हया मूर्खपणाच्या वार्ता ॥ आम्हीं नायकों ॥४५४॥

सांख्यकाणादबौद्धाद्यैर्जगद्भेदो यथा यथा ॥
उत्प्रेक्ष्यतेऽनेकयुत्त्क्या भवत्वेष तथा तथा ॥१००॥

सांख्य काणाद बौद्धादि मती ॥ नाना भेदें वर्णिली जगतीं ॥
तयांच्या त्या मती सिद्धांतीं ॥ भ्रष्ट जाहल्या ॥४५५॥
तयांचें मत करावया खंड्ण ॥  प्रस्तुत विषय नाहीं जाण ॥
म्हणोनी तयाचें प्रतिपादन ॥ असो तैसे असो ॥४५६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 02, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP