महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक ६३ ते ६५

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते


या शक्ति: कल्पयेव्द्योम सा सव्द्योम्नोरभिन्नताम् ॥
आपाद्य धर्मधर्मित्वं व्यत्ययेनावकल्पयेत् ॥६३॥

प्रथम मायें आकाश कल्पिलें ॥ परि तें सदभिन्नत्व नाहीं दिसूंदिलें ॥
पश्चात् धर्मधर्मित्व भासविलें ॥ तईंच वैपरित्वें ॥२८५॥
तेणें आकाशाचे ठाईं आलें ॥ सत्ता भान पहिलें ॥
सत् ऐसें नांव दिलें ॥ वस्तु लागीं ॥२८६॥

सतो व्योमत्वमपन्नं व्योम्न: सत्तां तु लौकिका: ॥
तार्किकाश्चावगच्छंति मायाया उचितं हि तत् ॥६४॥

जैसा कां मृत्तिकेचा घट केला ॥ तो मातीपणा नाहीं सुटला ॥
तैसेंचि या आकाशाला ॥ सदत्व न सुटे ॥२८७॥
 म्हणोनी सतची झालें आकाश ॥ ऐसा भासविला भास ॥  
निर्रावकाशी अवकाश ॥ धर्म लाविला ॥२८८॥
आकाशीं सदत्व आणलें ॥ सदत्वीं आकाश कल्पिलें ॥
ऐसे मांडले घोटाळे ॥ नानाविव ॥२८९॥
तार्किकादि मत सिद्धांती ॥ येथेंच भांबाऊती पडती ॥
आकाश सद्रूपचि मानिती ॥ माया योगें ॥२९०॥
वादी० - अन्याची प्रतिती अन्य ॥ हें कैसें न्याया होईल मान्य ॥
बरें प्रतिती ही उपपन्न ॥ कैसी होते ॥२९१॥
स० - अरे माया हेचि उचित ॥ तेथ कैचा न्यायसिद्धांत ॥
न्यायासी जी विरुद्व येत ॥ तीच माया ॥२९२॥
भ्रामक दाखवी प्रतीति ॥ अन्याची अन्यावर भ्रांती ॥
जग भ्रमविलें याच रीती ॥ नाना मोहें ॥२९३॥

यद्यथा वर्तत तस्य तथात्वं भाति मानत: ॥
अन्यथात्वं भ्रमेणेति न्यायोऽयं सार्वलौकिक: ॥६५॥

जें जैसें आहे वर्तत ॥ तें तैसेंचि जरी दिसत ॥
तरी तें यथार्थ वाटत ॥ जैसेंच्या तैसें ॥२९४॥
वस्तु एक असावी ॥ ती भ्रमें भलतीच दिसावी ॥
ती अयथार्थ जाणावी ॥ समज तयाची ॥२९५॥
जैसें कां शुक्तिकेवरी ॥ रजताची भासली लकेरी ॥
भ्रांत्या प्रतीती आली खरी ॥ अन्यथात्व ॥२९६॥
नाना स्थाणुवरी पुरुष ॥ रज्जू वरी सर्पाभास ॥
येच रीती माया प्रतीतीस ॥ लोकीं येते ॥२९७॥
हें दिसें ऐसेंचि जरी असे ॥ तरी मृगजळाचेनी वोलांसे ॥
बिजारोपण करती माणसें ॥ भूमीचे ठाईं ॥२९८॥
एवं ऐशीच हो प्रतीती ॥ मायादेवीची हीच नीती ॥
तेथ शंका समाधान दोन्हीही भ्रांति ॥ जाणावी बापा ॥२९९॥
भ्रमेंचि आकाश दिसलें ॥ भ्रमेंचि देव मानिलें ॥
भ्रमेंचि सकळ कल्पियलें ॥ सृष्टीजात ॥३००॥
एवं “भ्रममूलमिदं जगत” ऐसाचि आहे सिद्धांत ॥
तेथें च रमताती भ्रांत ॥ माया योगें ॥३०१॥
येथोनी कैसेनी सुटावें ॥ ऐसें जरि विचारसी मनोभावें ॥
तरी तेंचि आतां सांगतों ऐकावें ॥ एकाग्र करूनी ॥३०२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 30, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP