महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक ३४ ते ३५

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते


वियदादेर्नामरूपे मायया सविकल्पिते ॥
शून्यस्य नामरूपे च तथा चेज्जीव्यतांचिस्म् ॥३४॥

जैसे सस्तुद्वचे वरती ॥ जैसि आकाशादि नामरूपें कल्पिती ॥
तैसेची माये शून्या वरती ॥ कल्पना करसी ॥१४९॥
सद्वस्तुचे ठाईं ऐसें कल्पिशी जरी कांहीं ॥ तरी तो अपसिद्धांत होई ॥
तुझाचि तुजला ॥१५०॥
शून्य म्हणजे कांहीं अहे ऐसे मानिशी ॥ कां कांहीं नाहीं ऐसें कल्पिशी ॥
आहे जरी तूं म्हणशी ॥ तरी शून्य कैसें ॥१५१॥
बरें नाहीं म्हणोनी बोलसी ॥ तरी सिद्धांता पुढें काय आणसी ॥
शून्यची प्रतिपादिसी ॥ कवणे रीती ॥१५२॥
वांझेचिया लेंकरा ॥ अधिकारसी गंधर्व नगरा ॥
नाना स्वप्नीय जनावरा ॥ मृगजळ पाजिशी ॥१५३॥
किंवा घेउनियां तमा ॥ सूर्य माखिशी उत्तमा ॥
गंवची नसतां सीमा ॥ प्रतिपादिसी ॥१५४॥
ऐशापरी शून्यता ॥ कल्पनामयी असतां ॥
चिरकाल राहूं जीविता ॥ तुझी तुझ्यापाशीं ॥१५५॥
वादी - तरी आमुचे शुन्याचियपरी ॥ तुमचिया सद्वस्तुचे उपरी ॥
कल्पित नामरूपातें अंगीकारी ॥ तुम्ही झालां ॥१५६॥
वास्तविक पहातां ॥ नामरूप हे आभाव तत्वता ॥
मग तुम्ही कैसे कल्पिता ॥ सद्वस्तुचे ठायीं ॥१५७॥

सतोऽपि नामरूपे द्वे कल्पिते चेत्तदा वद ॥
कुत्रेति निरधिष्ठानो न भ्रम: क्वचिदीक्ष्यते ॥३५॥

सि० - अरे आम्ही मुळींच झालें नाहीं म्हणतों ॥ तूची तयाचा अंगीकार करितो ॥
तये विषयीं आम्ही विचारतों ॥ सांग भातां ॥१५८॥
नामरूपें कल्पिशी ॥ तया अधिष्ठान काय घेशी ॥
सत किंवा असत मानशी ॥ अथवा जगत ॥१५९॥
सदधिष्टानची जरीम्हणूं लागसी ॥ तरी कोणाचें नामरूप कोणा कल्पिशी ॥
रजतादिकाचा आरोप करशी ॥ शुक्तिके वरती ॥१६०॥
अन्याचीं नामरूपें ॥ अन्या वस्तुशी आरोपे ॥
हे मले झाले सोपे ॥ भ्रमा तुझ्या ॥१६१॥
चोरे करावी चोरी ॥ तूं त्या मालकची आंगीकारी ॥
परि न्याय येता उजरी ॥ चोर तो चोर ॥१६२॥
विषा अमृत नाम ठेविलें ॥ पिउनी कोण सांग जियाले ॥
तैसेचि नामरूपाचे मासले ॥ सदधिष्ठानीं ॥१६३॥
ब्रम्हा चारीयांचा नातु ॥ सुखें सांगु तुला हया मातु ॥
परि नामरूपासी अधिष्ठातु ॥ सद्वस्तु नहोय ॥१६४॥
आतां असत म्हणू जावें ॥ तरि ते नाहींच स्वभावें ॥
तेणें कैसेनि हुवावें ॥ अधिष्टान ॥ १६५॥
वांझेच्या मुलाची कन्या ॥ रूपवती परम धन्या ॥
कोणवरील शुन्या ॥ वाचुनी तिला ॥१६६॥
म्हणोनीयां असत ॥ हें अधिष्ठान नाहीं होत ॥
आतां म्हणशी जगत ॥ तरीही मिथ्या ॥१६७॥
मुळींच जें नाहीं झालें ॥ तया अधिष्ठान आदी बोले ॥
वर्णन करी सुखें बागुलें ॥ बालामधी ॥१६८॥
एवं ऐसे झाले सिद्ध ॥ अधिष्ठान अमाव प्रसिद्धा ॥
नामरूप हे निर्विवाद ॥ मिथ्या रूप ॥१६९॥
वादि - अधिष्टान नाहीं झालें ॥ कल्पना रूपेची संचले ॥
ऐसे म्हणतां मिथ्यत्व आलें ॥ कैसें नामरूपा ॥१७०॥
सि० अरे अधिष्ठाना वांचून ॥ कल्पनाही नुगवते जाण ॥
भ्रमासी सुद्धा कारण ॥ अधिष्ठान व्हावें ॥१७१॥
एवं नामरूपादि मासलें ॥ मुळींच सद्वस्तु नाहीं स्पर्शलें ॥
म्हणोनी अपसिद्धांत झाले ॥ तार्किकांच ॥१७२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 30, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP